सुषमा अंधारेंवर कोसळला दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या दुर्दैवी घटनेने अंधारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुषमा अंधारेंवर कोसळला दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
Sushma Andhares Mother
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 11:41 AM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुषमा अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांचं काल निधन झालं. आज त्यांच्यावर बीडमध्ये अंतिम संस्कार होणार आहे. स्वत: सुषमा अंधारे यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. अंधारे यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याने अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर काल पोस्ट करून ही माहिती दिली आहे. सुषमाताई अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांना काही वेळापूर्वी देवाज्ञा झाली. अंत्यविधी मूळगावी नंदनज ता. परळी जी. बीड येथे उद्या सकाळी 8.30 वाजता होतील, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. अंधारे यांच्या मातोश्रीचं निधन वृद्धापकाळाने झाल्याचं सांगितलं जातं. सुषमा अंधारे यांच्या आईच्या निधनाची बातमी कळताच शिवसैनिका आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या दिशेने धाव घेतली.

Loading...

कोण आहेत सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि अभ्यासक आहे. सध्या त्या ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. सुषमा अंधारे या अत्यंत आक्रमक नेत्या असल्याने त्यांना अंगारवाली बाईही म्हटलं जातं. सुषमा अंधारे या आपल्या नावामागे आपल्या आजोबाचं नाव लावतात. आजोबा दगडू अंधारे यांचं नाव लावतात. त्यांच्यावर आजोबांचा मोठा प्रभाव आहे. आजोबांनीच त्यांचं संगोपन केलं होतं. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांच्या आजोबाचं मोठं योगदान राहिलं आहे.

सुषमा अंधारे यांना त्यांचे आजोबा रुबाब या टोपण नावाने संबोधत असत. आजोबांनीच त्यांना आयुष्यात ताठ मानेने आणि रुबाबत राहायला शिकवलं. ती शिकवण त्या आजही तंतोतंत पाळत आहेत. आजोबा आणि आईने सुषमा अंधारे यांना मोठ्या कष्टाने वाढवले आहे. सुषमा अंधारे यांच्या आई मितभाषी आणि प्रचंड कष्टाळू होत्या. प्रचंड कष्ट करून त्यांनी मुलांना वाढवलं. त्यांना सन्मानाने जगायला शिकवलं. त्यामुळे जेव्हा जेव्हा कुटुंबाबद्दल सुषमा अंधारे बोलत असतात तेव्हा आपल्या आई आणि आजोबांचा त्या नेहमी उल्लेख करत असतात. आज त्यांची आई गेल्याने त्यांचा मोठा आधारवड गेला आहे. त्यांच्यासाठी आई अत्यंत जवळची होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us