नितेश कराळे यांचा रडतानाचा व्हिडिओ ठरणार गेमचेंजर? पहिल्याच फेरीत प्रतिस्पर्ध्यांचा उडणार धुव्वा? मास्तरांनी थेट गणितच मांडले
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2026: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नितेश कराळे गुरूजींवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर ते धायमोकलून रडले. आता त्याचाच त्यांना फायदा होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

महेश शिंदे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानापूर्वी एक हायहोल्टेज ड्रामा झाला. नितेश कराळे मास्तरांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. त्यांना पक्षाने 6 वर्षांकरीता निलंबित केले. या कारवाईनंतर कराळे मास्तर धायमोकलून रडले. पण त्याचाच त्यांना फायदा होईल असा दावाही करण्यात येत आहे. कराळे गुरूजींना त्यांच्या विजयाचा विश्वास आहे. तर दुसरीकडे भाजपच्या प्राथमिक अहवालात कराळे गुरूजींचे पारडे जड असल्याचे मानले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
नितेश कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नितेश कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास आहे. पहिल्या फेरीत 40 ते 45 हजार मते मिळण्याची कराळे मास्तरांना अपेक्षा आहे. सेंकड नंबरची मते विजयी घोडदौडमध्ये आणू शकत असल्याची कराळे गुरुजींना अपेक्षा आहे. अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता कराळे गुरुजींनी व्यक्त केली आहे. लोकांचा बीजेपीविरोधात रोष आहे कारण बीजेपीचा आमदार निवडून दिला तर देवा भाऊ च्या विरोधात जाऊन आमचे प्रश्न विचारू शकत नाही हे बीजेपीच्या लोकांनी बोलून दाखवलं काँग्रेसचा उमेदवार सहा वर्षे आमदार होता पण एक विद्यार्थ्यांचा प्रश्न विचारला नाही. एक कवडीचा फायदा झाला नाही अशी टीका नितेश कराळे गुरूजींनी केली.
भाजपच्या सर्व्हेत काय?
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या निवडणुकीसाठी होम ग्राऊंड उतरले. त्यांनी हिरारीने प्रचार केला. भाजपने ही जागा कोणत्याही परिस्थिती हातची जाऊ द्यायची नाही असा पण केला. तर दुसरीकडे भाजपच्या सर्व्हेत नितेश कराळे गुरूजींचे पारडे जड असल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यांना पहिल्या पसंतीची 15,000 मतं मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजे इतर उमेदवारापेक्षा कराडे गुरूजी डार्क हॉर्स ठरू पाहत आहेत. गुरूजींचा रडतानाचा व्हिडिओ ठरणार गेमचेंजर?
नागपूर पदवीधर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे अभिजीत वंजारी हे अधिकृत उमेदवार आहेत. तर नितेश कराळे यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण निवडणूक प्रचारादरम्यान आपल्याला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याचा संभ्रम त्यांनी मतदारांमध्ये निर्माण केल्याचा आणि पक्ष शिस्तीचा भंग केल्याचे सांगत राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली. प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून 6 वर्षांसाठी राष्ट्रवादीतून निलंबित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर कराळे गुरूजी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते भावूक झालेत. ते या पत्रकार परिषदेत धायमोकळून रडले.
