Aurangabad: शहरात सध्या एकच चर्चा, औरंगाबादला कोणतं गिफ्ट मिळणार? डॉ. भागवत कराडांच्या ट्विटचा अर्थ काय?

| Updated on: Jan 16, 2022 | 7:08 AM

अनेकजण ट्विटचे अनेक अर्थ काढतायत. देवगिरी किल्ल्यावरील रोप वे आणि लाइट अँड साउंड शोबद्दलचा तर्कही लावून झालाय. आता स्वतः केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडच या चर्चांना पूर्णविराम देतील तेव्हा ट्विटचा खरा अर्थ समोर येईल.

Aurangabad: शहरात सध्या एकच चर्चा, औरंगाबादला कोणतं गिफ्ट मिळणार? डॉ. भागवत कराडांच्या ट्विटचा अर्थ काय?
डॉ. भागवत कराड यांच्या ट्विटमुळे शहराच चर्चांना उधाण
Follow us on

औरंगाबादः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी नुकतेच केलेल्या एका ट्विटची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. ‘ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा’ असे ट्विट मंत्री कराड यांनी केले आहे. विशेष म्हणजे एवढे वाक्य न देता भागवत कराड यांनी स्वतःच्या फोटोमागे ऐतिहासिक देवगिरी किल्ला दाखवला आहे. त्यामुळे या किल्ल्यासंबंधी काही घोषणा होणार का, असे तर्क लावले जात आहेत. तर किल्ल्याचे हे चित्र केवळ भुलवण्यासाठी लावलेय, असाही तर्क केला जातोय. एकूणच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्विटमुळे केंद्रीय मंत्र्यांचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे.

डॉ. कराड यांचे ट्विट काय?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 12 जानेवारी रोजी एक ट्विट केलंय. लवकरच ऐतिहासिक निर्णयाची घोषणा, stay tune.. असा मजकूर त्यात आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा, नितीन गडकरी, एन सीतारमण तसेच भाजपच्या महत्त्वाच्या हँडल्सना टॅग केले आहे. त्यामुळे औरंगाबादसाठीची ही घोषणा नेमकी कोणत्या खात्यासाठी आहे, याबाबत अधिकच संभ्रम निर्माण करण्यात आलाय.

कोणत्या महत्त्वाच्या प्रकल्पांची हवा?

केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटचा अर्थ काढण्यात अनेक दिग्गज आपली ताकद पणाला लावत आहेत. कुणी शहराच्या नामांतरावर बोलतंय तर कुणी विमानतळ विस्तारीकरणाच्या मुद्द्याचा अंदाज बांधतंय. शहारत सध्या एक नाही तर दोन मेट्रो प्रकल्पांचीही हवा आहे तर अखंड उड्डाण पुलाचे स्वप्नही लोक रंगवू लागलेत. देवगिरी किल्ल्यावरील रोप वे आणि लाइट अँड साउंड शोबद्दलचा तर्कही लावून झालाय. आता स्वतः केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडच या चर्चांना पूर्णविराम देतील तेव्हा ट्विटचा खरा अर्थ समोर येईल.

इतर बातम्या-

बँकेची सत्ता हाती येताच बाळासाहेबांचा फोटो उतरवला, फक्त राणेंचा फोटो लावला; शिवसेनेकडून संताप व्यक्त

सारा अली खान फॅमिलीसोबत करतेय सुट्टी इन्जॉय, कोरोना नियम पाळत देवदर्शन, आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर