चांगली बातमी: औरंगाबादमध्ये सी बँड डॉपलर रडार बसवणार, डाटा 24 तास उपलब्ध असावा, हवामान तज्ज्ञांची विनंती!

| Updated on: Nov 23, 2021 | 7:47 PM

औरंगाबादमध्ये सी बँड डॉपलर रडार बसवण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही महत्त्वाची यंत्रणा ठरेल. त्यामुळे आता लवकरात लवकर रडार शहरात बसवण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी येथील तज्ज्ञ व शेतकऱ्यांची इच्छा आहे.

चांगली बातमी: औरंगाबादमध्ये सी बँड डॉपलर रडार बसवणार, डाटा 24 तास उपलब्ध असावा, हवामान तज्ज्ञांची विनंती!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी औरंगाबादमध्ये लवकरच सी बँड डॉपलर रडार (Doppler Radar) बसवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने यासाठीची परवानगी दिली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar) यांच्याशी चर्चा करुन सी बँड डॉपलर रडार संदर्भात आग्रहपूर्वक मागणी केली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावादेखील केला होता.

300 ते 400 किमी भूभाग रडारच्या नियंत्रणात

याविषयी सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादमध्ये सी बँड डॉपलर रडार बसवण्यासंदर्भात नुकतीच मान्यता दिली आहे. यासंदर्भातील पत्रही पाठवण्यात आले आहे. भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून सी बँड रडार बसवण्यात येणार आहे कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात ही रडार अत्यंत महत्त्वाची भूमिका येत्या काळात बजावू शकते. किमान 300 ते 400 किलोमीटरचा भूभाग या रडारच्या परीघात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संदर्भात अचूक माहिती मिळणार आहे.

डाटा पब्लिक डोमेनमध्ये 24 तास डाटा उपलब्ध असावा- हवामान तज्ज्ञ

मराठवाडा आणि एकूणच मराठवाड्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया औरंगाबादचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे. या रडारमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील भूभागातील हवामानाचा अचूक अंदाज घेणे सोपे जाईल, असे ते म्हणाले. अशा प्रकारची डॉपलर रडार केवळ नागपूर, गोवा, मुंबई, सोलापूर या ठिकाणीच असल्याची माहिती त्यांनी दिली. फक्त सरकारतर्फे ही यंत्रणा बसवण्यात येत असल्याने, यातून उपलब्ध होणारा डाटा 24 तास पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असावा, अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे. जेणेकरून शनिवार, रविवार किंवा सुटीच्या दिवशीदेखील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देता येईल, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

इतर बातम्या-

केवढे हे क्रौर्य…देवाघरच्या फुलावर कट्यारीचे वार, नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी गंभीर जखमी, लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न

कोण होणार रिलायन्सचा उत्तराधिकारी? मुकेश अंबानी बनवतायत महत्त्वाचा प्लॅन : रिपोर्ट