Ayush Komkar Murder : आंदेकरच्या बँक खात्यात मोठं घबाड, पहिल्यांदाच आकडा आला समोर, पोलिसांनी 27 खाती गोठवली

मोठी बातमी समोर येत आहे, पुण्यातील आयुष कोमकर या तरुणाच्या हत्येचा तपास सुरू असतानाच आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, आंदेकर टोळीचे तब्बल 27 बँक खाती गोठवण्यात आली आहे.

Ayush Komkar Murder : आंदेकरच्या बँक खात्यात मोठं घबाड, पहिल्यांदाच आकडा आला समोर, पोलिसांनी 27 खाती गोठवली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2025 | 3:51 PM

काही दिवसांपूर्वी पुण्यात आयुष कोमकर या तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती, पाच सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. आयुष केमकर याची हत्या पुण्यातील टोळी युद्धातून झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर याच्यावर आयुष केमकरच्या हत्येचा आरोप आहे. आपला मुलगा वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याने आपल्याच नातवाला लेकीच्या मुलाला संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर टोळीतील अनेक जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे, ती म्हणजे आंदेकर टोळीचे तब्बल 27 बँक खाती पलिसांनी फ्रिज केली आहेत. आंदेकरच्या बँक खात्यात पोलिसांना मोठं घबाड आढळून आलं आहे. आतापर्यंत या टोळीची 27 बँक खाती पोलिसांना सापडली असून, ती सर्व गोठवण्यात आली आहेत. आंदेकर टोळीचा मोहरक्या असलेला बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्या नाना पेठेमधील मालमत्तेचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांना आतापर्यंत 27 खाती सापडली आहेत, ती सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. दरम्यान  या खात्यामध्ये नव्याने 50 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी यापूर्वी बंडू आंदेकर याच्या घरातून लाखो रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने आणि 10 पेक्षा अधिक साठेखत जप्त केले होते. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

पुण्यात पाच सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली, त्याच्यावर तब्बल 12 गोळ्या झाड्यात आल्या, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. आयुष कोमकर हा वनराज कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आहे. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच बंडू आंदेकर याने आयुषची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर सह अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, आता त्यांच्या संपत्तीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.