AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक अट मान्य करा, लगेच माघार घेईन; सुनेत्रा पवारांविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेसची मोठी मागणी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे आकाश मोरे यांनी खळबळजनक अट ठेवली आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास ते उमेदवारी मागे घेण्यास तयार आहेत.

एक अट मान्य करा, लगेच माघार घेईन; सुनेत्रा पवारांविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेसची मोठी मागणी
Sunetra Pawar Congress Akash more
| Updated on: Apr 08, 2026 | 1:25 PM
Share

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता अनपेक्षित वळण घेतले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. आकाश विश्वनाथ मोरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी होऊन महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला, तर मी आता निवडणुकीतून माघार घेण्यास तयार आहे, असे खळबळजनक विधान आकाश मोरे यांनी केले आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

नेमका पेच काय?

अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या बारामतीच्या जागेवर महायुतीने राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन ही जागा राखण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र आकाश मोरे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.

मागणी काय?

मी निवडणूक लढवण्यावर आजही ठाम आहे. परंतु पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. माझी केवळ एकच मागणी आहे की अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महाराष्ट्रात रितसर गुन्हा दाखल व्हावा. जर ही मागणी पूर्ण झाली, तर मी बारामती पोटनिवडणुकीतून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास आजही तयार आहे, असे बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रिंगणात उतलेले आकाश मोरे यांनी म्हटले आहे.

एकीकडे उमेदवारीवरून सस्पेन्स असला तरी आकाश मोरे यांनी त्यांच्या प्रचाराचे पूर्ण नियोजन केले आहे. येत्या १० एप्रिलला आकाश मोरे हे बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी काँग्रेसकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रासप अध्यक्ष महादेव जानकर आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आकाश मोरे यांनी दिली. तसेच पार्थ पवार यांनी काँग्रेस संदर्भात केलेले विधान चुकीचे आणि राजकीय पोरकटपणाचे असल्याचे म्हणत आकाश मोरे यांनी जोरदार टीका केली.

 शरद पवार गटाकडून जाहीर पाठिंबा

दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अद्याप आपला एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी जाहीरपणे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे आकाश मोरे यांच्या एका मागणीने बारामतीचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बारामतीच्या राजकारणात काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....