ह्रदय हेलावणाऱ्या घटनेने संपूर्ण बारामतीकर सुन्न, मुलगा आणि दोन नातीच्या अपघाती मृत्यूचा जबर धक्का, आजोबांनीही सोडले प्राण

एका धक्कादायक घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला तर यानंतर आजोबांना देखील या घटनेमुळे हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

ह्रदय हेलावणाऱ्या घटनेने संपूर्ण बारामतीकर सुन्न, मुलगा आणि दोन नातीच्या अपघाती मृत्यूचा जबर धक्का, आजोबांनीही सोडले प्राण
| Edited By: | Updated on: Jul 28, 2025 | 11:07 AM

बारामती : बारामतीमध्ये एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. मुलाचा आणि दोन नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने आजोबांचा देखील मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जणांनी जगाचा निरोप घेतल्याने गावात शोककळा पसरलीये. आज पहाटे आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या मुलाचा आणि दोन नातीचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसून आजोबा राजेंद्र आचार्य यांनी जीव सोडला. मुलगा वडील राजेंद्र आचार्य हे आजारी असल्याने त्यांना फळ आणण्यासाठी बाहेर गेला असता हा अपघात झाला.

डंपरने दुचाकीला दिली धडक आणि बाप लेकींचा मृत्यू

बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात काल रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली आणि यात दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले. यात वडिल आणि दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुलाच्या आणि नातींच्या निधनाबद्दल कळताच आजोबांनी सोडले प्राण 

या घटनेत ओंकार आचार्य, त्यांची चार वर्षाची मुलही मधुरा आणि दहा वर्षाची सई मृत्यू यांचा मृत्यू झाला. घरातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मुलीचे आजोबा यांना समजली आणि याचा धक्का 70 वर्षीय आजोबाला बसला. आज पहाटे मयत मुलीचे आजोबा राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. घरातील चौघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

एकाच घरातील चार जणांचा मृत्यू कुटुंबावर शोककळा 

राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आले. वडिलांना घरी आणल्यानंतर ओंकार आचार्य हे फळ आणण्यासाठी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मार्केटमध्ये गेले असता त्यांना डंपरने धडक दिली. राजेंद्र आचार्य हे अगोदरच आजारी होते आणि त्यामध्येच त्यांना मुलाचा आणि नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला आणि त्यांचे निधन झाले.