ऐकावं ते नवलंच! बीडमध्ये चक्क पाझर तलाव गेला चोरीला, नेमकं काय घडलं? वाचा…

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दैठणा गावात चक्क पाझर तलाव चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऐकावं ते नवलंच! बीडमध्ये चक्क पाझर तलाव गेला चोरीला, नेमकं काय घडलं? वाचा...
Beed Dam News
| Updated on: Jun 23, 2025 | 4:34 PM

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे सतत चर्चेत आहे. आताही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दैठणा गावात चक्क पाझर तलाव चोरीला गेल्याची घटना घडली आहे. जी जमीन शासनाने तलावासाठी संपादित केली होती, त्या जागेवर तलाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संपादनाचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे बबन झांबरे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील दैठणा परिसरातील गात 4 मधील पाझर तलाव कागदपत्रावर आहे मात्र प्रत्यक्षात तलावच अस्तित्वात नाही. गेली 20 वर्षांपासून बबन झांबरे हे तलावाचा पाठपुरावा करत आहेत, तलाव शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आद्याप त्यांना तलाव सापडलेला नाही. त्यामुळे तलाव ज्यांनी चोरी केला आहे त्या आधिकाऱ्यांवर आणि संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत बबन झांबरे व ग्रामस्थांनी आष्टी तहसील कार्यालयसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

याबाबत बोलताना बबन झांबरे यांनी म्हटले की, “माझी जी जमीन तलावासाठी संपादित करण्यात आली आहे तिथे तलाव नाही. मात्र जिथे तलाव बांधलेला आहे तिथली जमीन संपादित झालेली नाही. त्यामुळे आम्हाला त्रासाचा सामना करावा लागत आहे. गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती प्रशासन हाताशी धरुण आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. जो पर्यंत चौकशी होऊन संबधीतांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण माघे घेणार नाही. न्याय नाही मिळाला तर आत्महदन करु.”

याबाबत बोलताना सरपंच संभाजी झांबरे यांनी म्हटले की, ‘मौजे दैठणा गात अ 4 हा तलाव 2007 पासून तलाव चोरीला गेला आहे. हा तलाव कागदावर दाखवला जात आहे. मात्र तलावासाठी संपादित झालेल्या जागेवर गेल्यास तिथे तलाव नाही. त्यामुळे चोरीला गेलेला तलाव आम्हाला सापडून द्यावा. तसेच ज्या लोकांना तलाव चोरी केला आहे, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी.’

Follow Us