Beed | बीड जिल्ह्यात अपघात मालिका सुरूच, वांजरा फाट्याजवळ पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन दिवसात 12 बळी!

कारमधील अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Beed | बीड जिल्ह्यात अपघात मालिका सुरूच, वांजरा फाट्याजवळ पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन दिवसात 12 बळी!
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 11:32 AM

बीडः बीड जिल्ह्यात अपघातांची मालिका (Accidents) सुरूच आहे. पाटोदा गावाजवळील वांजरा फाटा येथे कारच्या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू (Husband wife killed in Car Accident) झाल्याची बातमी हाती आली आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये प्रवास करणारे पती पत्नी या दोघांनाही गंभीर (Seriously injured) इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मागील तीन दिवसातच बीडमध्ये झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे.

मृत उस्मानाबादमधील भूमचे रहिवासी

बीडमधील पाटोदा गावाजवळ वांजरा फाटा येथे कारला हा भीषण अपघात झाला. कारमध्ये उस्मानाबादमधील भूम येथील रहिवासी अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी होते. या कारचा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही एखाद्या भरधाव वाहनाने कारला धडक दिल्याचे अपघात स्थळावरील दृश्यांतून दिसत आहे. कारमधील अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शनिवारी अपघातात 06 ठार

बीडमध्ये शनिवारी अंबाजोगाई तालुक्यातील सायगवाच्या खडी केंद्राजवळही भीषण अपघात झाला. आर्वी येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी जाणाऱ्या नातेवाईकांच्या जीपला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात पाच महिला आणि एक बालक जागीच ठार झाले होते. मागील तीन दिवसातला आज घडलेला तिसरा अपघात असून बीड जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या तीन दिवसात 12 वर पोहोचली आहे.

सांगलीत स्कूल बसला अपघात

सांगली जिल्ह्यात स्कूल बसला झालेल्या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. विद्यार्थ्यांना सोडायला जाणाऱ्या या बसमध्ये जवळपास 25 ते 30 विद्यार्थी होते. बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा आरोप पालकांनी केलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे स्कूल बस थेट शेतात जाऊन पलटी झाली. या घटनेत सात ते आठ विद्यार्थी जखमी झाले.

इतर बातम्या-

School Bus Accident : सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये स्कूल बस पटली! 7 ते 8 विद्यार्थी जखमी

Nashik: किमती गगनाला भिडल्याने बैल चोरीच्या घटना वाढल्या; शेतकरी हवालदिल