Beed Accident : माजलगाव अपघात प्रकरणाला नवे वळण, भाजपा नगरसेवकाचा मुलगा अल्पवयीन? फेसबुकवर मात्र तलवार घेऊन…

अपघातावेळी अनुज नाईकनवरे हा गाडी चालवत होता. माझा मुलगा शेजारच्या सीटवर बसला होता. अनुज यांच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्या मुलावर केला, असा दावा भाजपा नगरसेवकाने केला.

Beed Accident : माजलगाव अपघात प्रकरणाला नवे वळण, भाजपा नगरसेवकाचा मुलगा अल्पवयीन? फेसबुकवर मात्र तलवार घेऊन...
beed majalgaon accident
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 6:31 PM

Beed Racing Accident : भाजप नगरसेवकाच्या मुलाने रेसच्या नादात घेतला दाम्पत्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. या अपघातात क्रेटा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दामत्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आता याच प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. भाजपा नगरसेवक दीपक मेंडके यांचा मुलगा या प्रकरणात आरोपी आहे, असे बोलले जात होते. परंतु दीपक मेंडके यांनी समोर येत माझा मुलगा गाडी चालवत नव्हता, असे सांगितले आहे. सोबतच हा दावा खरा असल्याचे सांगत एक व्हिडीओ समोर आणला आहे. दीपक मेंडके यांचा मुलगा अल्पवयीन असल्याचाही दावा केला जातोय. परंतु मेंडके यांच्या मुलाच्या फेसबुक प्रोफाईलवरून तो सज्ञान असल्याचा दावा केला जातोय.

नगरसेवकाच्या मुलाच्या हतात तलवार

या अपघात प्रकरणातील आरोपी अनुज नाईकनवरे गाडी चालवत असल्याचे भाजपा नगरसेवक दीपक मेंडके यांनी सांगितले आहे. याच्या पुराव्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील दिला असून. दुसरीकडे पोलिसांनी मेंडके यांचा मुलगा हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. परंतु या अपघात प्रकरणात नगरसेवक दिपक मेंडके यांच्या गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन मुलाचे फेसबुक खाते पाहिल्यास संबंधित मुलगा अल्पवयीन नसल्याचा दावा केला जातोय. संबंधित मुलाच्या फेसबुक खात्यावर हातात तलवार घेतलेला प्रोफाइल फोटो आहे. मयत गायकवाड यांच्या मुलानेदेखील त्यांच्या गाडीत हत्यारं होते असा दावा केला होता. दीपक मेंडके यांच्या मुलाच्या हातात तलवार असल्याचा फोटो यासह त्याच मुलाचे अनेक आलिशान गाड्यांसोबतही फोटो आहेत. यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Loading...

दीपक मेंडके यांचा दावा काय?

अपघातावेळी अनुज नाईकनवरे हा गाडी चालवत होता. माझा मुलगा शेजारच्या सीटवर बसला होता. अनुज यांच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्या मुलावर केला. मी नगरसेवक आहे, माझी पत्नी नगरसेवक आहे. मला राजकीय द्वेषातून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. अनुज नाईकनवरे याने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन जबाब दिला आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पोलिसांनी अधिक तपास करायला हवा, असं दीपक मेंडके यांनी सांगितले. हा रेसचा प्रकार नसून केवळ राजकीय बदनामीपोटी केलेले षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणात काय काय खुलासे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us