AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले, संतोष देशमुखांच्या पत्नीला गावकऱ्यांची पसंती, कसा असेल संपूर्ण कार्यक्रम?

बीडच्या मस्साजोग सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता असून, दुसरीकडे मकोका न्यायालयातही सुनावणीला वेग आला आहे. वाचा सविस्तर बातमी.

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले, संतोष देशमुखांच्या पत्नीला गावकऱ्यांची पसंती, कसा असेल संपूर्ण कार्यक्रम?
santosh deshmukh
| Updated on: Apr 07, 2026 | 11:42 AM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर मस्साजोग गावच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज ७ एप्रिल २०२६ पासून मस्साजोग गावच्या सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करून त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संधी द्यावी, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण ८८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १६ सरपंच आणि ७२ सदस्य अशा एकूण ८८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या ७ एप्रिलपासून १३ एप्रिलपर्यंत मस्साजोगच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आजपासून या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा?

  • अर्ज दाखल – 7 ते 13 एप्रिल
  • अर्जाची छाननी – 15 एप्रिल
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – 17 एप्रिल
  • मतदान – 28 एप्रिल
  • निकाल – 29 एप्रिल

गावचा कारभारी बिनविरोध निवडला जाणार?

संतोष देशमुख यांच्या निधनामुळे गावात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित १८ महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्या कुटुंबालाच मिळावा, अशी मागणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि विविध पॅनेल प्रमुखांनी स्वतःहून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे.

संतोष अण्णांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी इतर इच्छुकांनी अर्ज भरू नयेत आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन गावकऱ्यांकडून केले जात आहे. येत्या दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मस्साजोगच्या पोटनिवडणुकीची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

मकोका न्यायालयात सुनावणी: उज्ज्वल निकमच चालवणार खटला

दरम्यान एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होत आहे. या खटल्यात कायदेशीर पेच निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे. आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे आता खटल्याच्या प्रत्यक्ष युक्तीवादाला वेग येणार आहे.

आज न्यायालयात सर्व साक्षी-पुराव्यांची यादी सादर केली जाणार आहे. त्यामुळे आरोपींच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय देखील न्यायालयाने राखून ठेवला आहे. आरोपींचा उद्देश केवळ केस लांबवण्याचा होता, मात्र आता पुढील ६ महिन्यांपासून एका वर्षाच्या आत निकाल लागून आरोपींना कडक शिक्षा होईल,” असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....