शरद पवारांच्या पक्षाच्या खासदाराची थेट निवडणूक अधिकाऱ्यालाच मोठी धमकी, थेट म्हणाले, लाट्याचा कार्यक्रम…

मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा तूफान चर्चेत आहे. त्यामध्येच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे वातावरण अधिकच पेटल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच नुकताच खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाच मोठी धमकी दिली आहे.

शरद पवारांच्या पक्षाच्या खासदाराची थेट निवडणूक अधिकाऱ्यालाच मोठी धमकी, थेट म्हणाले, लाट्याचा कार्यक्रम...
Sharad Pawar
| Updated on: Nov 24, 2025 | 10:07 AM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीचे वारे असून सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. यादरम्यानच बीडमध्ये नेमके काय सुरू आहे, याची थेट जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. बीड जिल्ह्यांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकार परिषदेदम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच धमकी देऊन टाकली आहे. फक्त हेच नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा त्यांनी अनेकदा एकेरी उल्लेखही केला. मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याचा काय कार्यक्रम करायचा खासदार म्हणून तो करेल, असेही त्यांनी म्हटले. परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांचा लाट्या असा उल्लेख खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

बजरंग सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेमध्ये धमकी दिली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिले आहेत. यातील दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले होते. हे अर्ज कोणाच्यातरी दबावाखाली अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. यादरम्यान आता खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्या फॉर्मला वेगळा न्याय. लाटकर नावाचा आहे लाट्या.. किती दिवस झाले त्याला सांगितले… लोकसभेला तोच… विधानसभेला तोच… नगरपरिषदेला तोच… मनानं बदलून गेला तर ठीक नाही तर त्याचा काय कार्यक्रम करायचा खासदार म्हणून तो करेल.. त्याला काय वाटायला लागले..

कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ते.. एक फॉर्म यावर निरंक केलेला आहे तो बाद होतो.. दुसरा फॉर्म वैध होतो ते आम्ही कोर्टात प्रेझेंट करणार आहोत. लाट करणे लाटणे बंद केले पाहिजे नाही तर लाटणे घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येतील असे सोनवणे यांनी म्हटले आहे. खासदार सोनवणे यांनी अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकार्‍यावर बोलण्याने तसेच एकेरी भाषेत उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.