बीडच्या परळीमध्ये धक्कादायक प्रकार, लाठी-बेल्टने तरुणाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल!

जिल्ह्यातील परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील जलालपूर भागात तरुणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीदरम्यान तरुण विव्हळत होता.

बीडच्या परळीमध्ये धक्कादायक प्रकार, लाठी-बेल्टने तरुणाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल!
parli crime news
| Updated on: May 16, 2025 | 9:45 PM

Beed Parli Crime News : जिल्ह्यातील परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील जलालपूर भागात तरुणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीदरम्यान तरुण विव्हळत होता. मात्र तरीदेखील टोळक्यांनी काठी, बेल्टने या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

टोळक्याने तरुणाला केली जबर मारहाण

काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर या जिल्ह्यातील गुंडगिरीची अनेक प्रकरण समोर आली होती. आता या सर्व घटना मागे पडत असतानाच परळीतीली जलालपूर येथे बेदम मारहाणीची ही नवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परळीतील जलालपूर भागात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. एका कार्यक्रमात दोन गटांत हाणामारी झाली होती. याचाच राग मनात धरून दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.

नेमकं काय घडलं?

एका युवकाला दहा ते बारा जणांनी जबर मारहाण केली आहे. परळी शहरातील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने पीडित तरुणाचे अगोदर अपहरण केले. या टोळक्याने तरुणाला अमानुषपणे मारहाण केली आहे. अजुनही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कठोर कारवाईची केली जातेय मागणी

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर लवकर मारहाण करणाऱ्या माथेफिरूंना लवकरात अटक करावे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळलेली आहे, असा आरोप केला जातो. असे असतानाच या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.