जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात मोठी अपडेट, या गोष्टींमुळे वरिष्ठांनी…

Beed News : वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर यांच्या निधनाने खळबळ उडाली. अचानक त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला. मात्र, यादरम्यान कुटुंबियांनी गंभीर आरोप केली असून एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात मोठी अपडेट, या गोष्टींमुळे वरिष्ठांनी...
Sachin Jadhavar Beed
| Updated on: Jan 24, 2026 | 9:56 AM

अशोक काळकुटे बीड : बीड येथील वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली. मात्र, सुरूवातीपासूनच ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबियांकडून केला गेला. हेच नाही तर यादरम्यान अनेक संशयास्पद गोष्टी घडल्या, ज्याचे उत्तर असूनही मिळू शकले नाही. पतीच्या आत्महत्येला सात दिवस होऊनही गुन्हा दाखल झाला नसल्याने सचिन जाधवर यांची पत्नी आक्रमक झाली. तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नाही यामुळे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्याबाहेरच आंदोलन केले. कोवळ्या लेकीला घेऊन सचिन जाधवर यांची पत्नी पतीला न्याय मिळावा म्हणून आंदोलनाला बसली. शेवटी पोलिसांनी या प्रकरणात सात दिवसानंतर सचिन जाधवर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सचिन जाधवर यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळला. यादरम्यान एक नोट सापडली, ज्यामुळे प्रदीप फाटे यांच्या नावाचा उल्लेख होता आणि यासोबतच काही गंभीर आरोपही करण्यात आली होती. सचिन जाधवर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये प्रदीप फाटे हा मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख केलेला होता. सचिन जाधवर यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप फाटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

फाटे हा ठराविक फर्मच्या फाईल अगोदर करून दे असे म्हणत दबाव टाकत होता. याच त्रासाला कंटाळून जाधवर यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर सात दिवस होऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन देखील केले.

या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, सचिन जाधवर यांनी आत्महत्या कशी केली हे अद्याप उघड झालेले नसून अनेक बाबी संशयास्पद आहेत. ज्याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने आत्मत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे देखील होऊ शकतात. यादरम्यान सचिन जाधवर यांच्या पत्नी म्हणाल्या की, माझे पती कधी आत्महत्या करूच शकत नाहीत.