बॉलिवूडवर मोठं संकट, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल, मुलगाही अडकला; काय आहे प्रकरण ?
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांचा मुलगा कृष्णा भट्ट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. व्यावसायिकांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली 13.5 कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही त्यांच्यावर 30 कोटींच्या फसवणुकीचे आरोप होते. विक्रम भट्ट यांच्या सततच्या कायदेशीर अडचणींमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. विक्रम बट्ट आणि त्यांच्या मुलांवर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम भट्ट यांनी काही व्यावसायिकांकडून पैसे घेतले होते. सिनेमात आणि इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे आमिष दाखव त्यांनी हे पैसे घेतले होते. मात्र अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही व्यावसायिकांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विक्रम भट्ट यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्माते दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्याचा मुलगा कृष्णा भट्ट याने आपली 13 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका व्यावसायिकाने पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा पोलिस ठाण्यात विक्रम भट्ट आणि त्यांचा मुलगा कृष्णा भट्ट दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने स्वतःकडे वर्ग करून घेतला आहे.
यापूर्वीही विक्रम भट्ट याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. दोन महिन्यापूर्वी राजस्थान पोलिसांनी विक्रम भट्ट याला अटक केली होती. त्याच्यावर ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता. विक्रमसह त्याची पत्नी श्वेतांबरी भट्ट हिलाही अटक करण्यात आली होती.
दरम्यान अटकेपूर्वी साधारण 1 आठवडा उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली होती. इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रम भट्टवर लावण्यात आला होता. या नोटीशीमध्ये सर्व आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आणि परवानगीशिवाय परदेश प्रवास न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अटक झाल्यापासून विक्रम सतत चर्चेत आहे. तर आता विक्रम व त्याचा मुलगा यांच्याविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 व्या वर्षी सुरू केलं करिअर
विक्रम भट्टने 1982 साली वयाच्या 14 व्या वर्षी दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्यासोबत “कानून क्या करेगा” या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. हा आनंदचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्याने मुकुल आनंदसोबत ‘अग्निपथ’ चित्रपटात काम केले, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर, विक्रमने शेखर कपूर आणि महेश भट्ट यांच्यासोबत प्रत्येकी दोन वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या काळात त्याने अनेक हिट चित्रपट दिले, त्यापैकी एक “हम हैं राही प्यार के” होता.
