AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बीड हादरलं, सरकारी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, त्याच्याच कारमध्ये सापडली डेड बॉडी

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, सरकारी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला आहे.

मोठी बातमी! बीड हादरलं, सरकारी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, त्याच्याच कारमध्ये सापडली डेड बॉडी
सरकारी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 17, 2026 | 5:43 PM
Share

बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोलापूर- धुळे महामार्गालगत एका कारमध्ये या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहासोबत कोयता देखील आढळून आल्यामुळे घातापाताचा संशय व्यक्त होत आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे, सचिन जाधवर हे कालपासून बेपत्ता होते, त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. सोलापूर- धुळे महामार्गालगत एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला, तसेच याच कारमध्ये एक कोयता देखील आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते कालपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या पत्नीने बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. आज दुपारी सचिन जाधव यांची कार सोलापूर – धुळे महामार्गालगत आढळून आली, त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले, दरम्यान त्यांच्या कारमध्ये एक कोयता देखील आढळून आला आहे. दरम्यान सचिन जाधवर यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेनं खळबळ

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. त्यातच आता एका सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह कारमध्ये संशयास्परित्या आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ