Vastu Shastra : घराच्या या दिशेला लावा रजनीगंधाचे रोप; मिळेल पैसाच पैसा, नोकरी अन् व्यवसायातही यश
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना विशेष महत्त्व आहे, ही झाडं जर योग्य दिशेला लावले तर त्यापासून आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात, आज आपण रजनीगंधाच्या रोपाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? तुमच्या घरात असणाऱ्या वस्तूंची योग्य दिशा कोणती? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलच आहे. मात्र अनेकदा तुमच्या घरात अचानक काही समस्या निर्माण होतात, जसं की काही कारण नसताना घरात गृहकलह वाढतो, पती, पत्नीचं पटत नाही. कितीही पैसे कमावले तरी ते हातात टिकत नाही. अनेकदा हातात येणाऱ्या पैशांना ब्रेक लागतो. नोकरी किंवा व्यवसायात अपयश येतं, तर हे सर्व टाळण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काय उपाय करावेत? याबद्दल देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. आज आपण त्यातीलच एका सोप्या उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात जी आपल्या घरात लावणं शुभ मानलं जातं. ही झाडं घरात लावल्यास त्यामधून निर्माण होणारी ऊर्जा ही आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव निर्माण करते, या झाडांमुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि तुमच्या घरात जर वास्तुदोष निर्माण झाला असेल तर तो देखील दूर होतो. यामध्ये तुळस, शमी अशी अनेक झाडं आपल्याला सांगता येतील. पण यामध्ये आणखी एक महत्त्वाचं झाडं आहे, ते म्हणजे रजनीगंधा. वास्तुशास्त्रानुसार रजनीगंधाला शुभ मानण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरात योग्य दिशेला तुम्ही रजनीगंधाचं रोप लावलं तर त्यामुळे तुमच्या घराची भरभराट होते, सर्व प्रकारचे वास्तूदोष दूर होतात. आर्थिक स्थिरता येते आणि नोकरी, व्यवसायातही यश मिळतं.
रजनीगंधांचं रोप लावण्याची योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रामध्ये रजनीगंधाच्या रोपाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात रजनीगंधांचे रोप लावले तर त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकाराची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते, रजनीगंधांचे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास धनाची प्राप्ती होते, उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची आवडती दिशा आहे.
