AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
santosh deshmukh krishana andhale
| Updated on: Feb 16, 2025 | 11:53 AM
Share

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. या घटनेमुळे सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त दवस उलटले आहेत. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. आता फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे. बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यानंतर तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. त्याला फरार घोषित करण्यात आले.

कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने

तसेच आता कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सीआयडी अधिकाऱ्यांनी कृष्णा आंधळेंची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बीड कोर्टाने आज आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करा, असे आदेश देण्यात आले आहे. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने आहेत. तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. हे सर्व जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कृष्णा आंधळे कोण?

“कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्या घरी गरीबी आहे. पत्र्याचं घर आहे. त्याला फारसं काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो असा त्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वैगरे अशा ठिकाणी गेला आहे का? याचा तपास सुरु आहे. तो सध्या फरार आहे.” अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.