Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार ? विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण

बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्याचा अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले आहे की कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. कराडवर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि डिजिटल पुरावे, साक्षीदारांचे जबाब यांवरून त्याचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होतो. न्यायालयाने खटला पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार ? विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण
संतोष देशमुख हत्या प्रकरण
| Updated on: Jul 30, 2025 | 11:56 AM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. वाल्मीक कराड संदर्भात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. याच अर्जावरती निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत वाल्मीक कराडला दोष मुक्त का करण्यात येत नाही ? या संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यामध्ये वाल्मीक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले म्हणून अपहरण करून, कट रचून त्यांची हत्या केली.  वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल.  गेल्या 10 वर्षात त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत, तर बीड जिल्हा न्यायालयात 11 प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत असं नमूद करण्यात आलं.

अवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे, फोनवरुन धमकावणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे,  तसेच महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब, डिजिटल एव्हिडन्स, फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मीक कराडला दोष मुक्त करण्यात येत नाही. वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचं आता निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.

कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणे 

1) वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य – कोर्टाचं निरीक्षण.

2) वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला.

3) वाल्मीक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचाही कोर्टात उल्लेख.

4) वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातले आणि 11 गुन्हे बीड जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत.

5) वाल्मीक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे.

6) अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे वाल्मीक कराड हाच कटाचा मुख्य सूत्रधार.

7) दोन कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या.

8) खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला, म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचला, अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केला.

10) खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असे न्यायालयाने म्हटले.

11) वाल्मीक कराडचा संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सहभाग आणि सदस्यत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयाला साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल/फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत.

12) कराड गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे जो मृत देशमुख यांच्या हत्येसह कटात सहभागी. पाच गोपनीय साक्षीदारांनी त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे सिद्ध केले आहे.

13) तसेच अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनीही डिस्चार्ज अर्जाला विरोध केला आहे.