Beed Crime : अंगणात झोपलेल्या आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य! बीडमधील संतापजनक प्रकार

Beed 13 year old Girl molested by her own father : बीड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत माथेफिरु बापाला अटकही केलीये.

Beed Crime : अंगणात झोपलेल्या आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य! बीडमधील संतापजनक प्रकार
धक्कादायक...
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Jun 18, 2022 | 3:14 PM

बीड : बीडमध्ये (Beed Crime News) संताप आणणरी एक धक्कादायक घटना समोर आली. एका बापानं आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार (Girl molestation) केला. मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर आई बाहेर आली. तेव्हा बापाने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आता बीड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत माथेफिरु बापाला अटकही केलीये. पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. बीड जिल्ह्यातील (Beed News) शिरुर तालुक्यात ही खळबळजनक घटना घडलीय. अख्ख्या शिरुर तालुका या घटनेनं धास्तावलाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

नेमकी घटना काय घडली?

शिरुर तालुक्यातील एका गावात राहणारी 13 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी अंगणातील बाजेवर झोपली होती. यावेळी नराधम बापाने तिला खाली झोपायला सांगितलं. पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईला जाग आली. त्यानंतर आईलाही देखील मापानं जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी ही आठवीत शिकते. ती 13 जूनच्या मध्यरात्री घराच्या अंगणात झोपली असता हा संतापजनक प्रकार घडलाय.

हे सुद्धा वाचा

नराधम बापाला अटक

मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरुन आता शिरुरमधील कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करुन घेण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी असलेल्या नराधम बापालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जातेय. या नराधम बापाचं वय 36 वर्ष आहे. त्याच्या भा.द.वि. कलम 376 सोबत बाललैंगिक अत्याचार विरोधी कलम 4,6,8 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें