
विविध घडामोडींमुळे बीड जिल्हा नेहमीच राज्यात चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्हातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने खळबळ माजली होती. नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad)सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. पूजाने केलेली फसवणूक, मालमत्तेवर तगादा आणि ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी थेट स्वत:वर गोळी झाडून घेतली. आता या प्रकरणी पोलीस तपास करत असून पूजाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नेमकं काय काय घडलं चला जाणून घेऊया A टू Z अपडेट…
एका कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यामधील मैत्री गहन होत गेली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. गोविंद हा विवाहीत आहे, त्याला एक मुलगा आहे. तरीही त्याचे पूजासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्याने पूजाला महागडे दागिने, मोबाईल, मोटारसायकल, प्लॉट, शेती आणि इतर अनेक मौल्यवान भेट म्हणून दिल्या होत्या. तसेच गेवराई येथे एक भव्य बंगाल उभारला होता. या बंगल्यात गोविंद पत्नी, मुले आणि वडिलांसोबत राहत होता.
वाचा: गोरेगावमधील धक्कादायक प्रकार! आईला आवडला लेकीची BF, घरात चोरी झाली अन्… नेमकं प्रकरण काय?
गोविंदला दिली धमकी
बंगला नवा असताना पूजा काही दिवस गोविंदच्या या बंगल्यात राहत होती. तिला हा बंगला प्रचंड आवडला होता. तिने गोविंदकडे या बंगला तिच्या नावावर करण्याचा हट्ट केला होता. गोविंदने पूजाला समजावण्याचा प्रचंड प्रयत्न केला. “तुझ्यासाठी दुसरा बंगला बांधतो” असे गोविंद म्हणाला होता. पण पूजा काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती तिने गोविंदला धमकी दिली होती. “बंगला माझ्या नावावर केला नाहीस, तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन” असे ती म्हणाली. तिने गोविंदशी असलेला संपर्क तोडला होता.
पूजामुळे गोविंद तणावात आला
पूजा गोविंदचा फोन घेत नव्हती. तिने जवळपास त्याच्याशी संपर्क तोडला होता. आत्महत्येच्या दिवशी गोविंद पूजाला भेटण्यासाठी थेट कला केंद्रात गेला. तिथे पूजा त्याला भेटली नाही. त्याने मैत्रिणीच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपयोग झाला नाहीय. अखेर गोविंद पूजाच्या घरी गेला. त्याने तिच्या आईला विनंती केली की तुम्ही पूजाला काहीतरी समजवा, ती माझ्याशी बोलत नाही. मात्र, पूजाच्या आईकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. हताळ झालेला गोविंद पूजाच्या घरातून बाहेर निघाला. त्याने पूजा राहत असलेल्या सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील तिच्या घराबाहेर असलेल्या गाडीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोविंदच्या कुटुंबीयांनी पूजाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पूजाला अटक करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये पूजाने प्रेमाच्या नावाखाली आर्थिक लूट केली, भावनिक त्रास दिला आणि ब्लॅकमेल केले असे म्हटले आहे.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गोविंद बर्गे यांची गाडी लॉक होती. त्यामुळे पोलिसांनी लुखामालसा गावच्या सरपंचांना घडलेला प्रकार सांगून बोलावून घेतले. पोलिसांनी गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांना गाडीची दुसरी चावी घेऊन येण्यास सांगितले होते. बर्गे यांचे नातेवाईक आणि सरपंच घटनास्थळी पोहोचले तेव्हा गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरली होती. तसेच गाडी लॉक होती आणि आतमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. या गोष्टी अनपेक्षित होत्या.
पिस्तुल आले कुठून?
नातेवाईकांच्या सांगण्यांनुसार, गोविंद बर्गे कुठेही जाताना कधी साधी काठीही सोबत घ्यायचा नाही. मग त्याच्याकडे पिस्तुल कुठून आले? त्याच्याकडे कधीही पिस्तूल नव्हते, असे बर्गेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मेहुण्यानी पूजा विरोधात केली तक्रार
गोविंद बर्गेच्या आत्महत्येनंतर मेहुण्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला न्यायालयात दाखल करुन तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना आपल्या गावी बोलावून त्यांची हत्या केली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. आता पूजा या प्रकरणाबाबत काय माहिती देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.