Mahdev Munde : महादेव मुंडेंचा गळा कापला, शरीरावर 16 घाव, बीडमध्ये क्रुरकृत्याने मृत्यूही थरथरला

Mahadev Munde Murder Case : बीडमधील महादेव मुंडेंची सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच क्रूर हत्या केल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालातून क्रुरता समोर आली आहे. गुन्हेगारांच्या कृत्याने मृत्यूही थरथरला आहे.

Mahdev Munde : महादेव मुंडेंचा गळा कापला, शरीरावर 16 घाव, बीडमध्ये क्रुरकृत्याने मृत्यूही थरथरला
महादेव मुंडे यांची क्रूर हत्या
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 23, 2025 | 9:58 AM

महादेव मुंडे यांची 20 महिन्यांपूर्वी परळीत निर्घृण हत्या झाली होती. मात्र याप्रकरणात एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. या हत्याकांडातील आरोपी कोण याचाच पोलीस 18 महिने उलटूनही शोध घेत आहेत. मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यातून ही हत्या किती क्रूरपणे केली होती हे स्पष्ट होत आहे. गुन्हेगारांच्या कृत्याने मृत्यूही थरथरला आहे.

अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या

महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांची श्वसननलिका कापली होती. मुख्य रक्तवाहिन्या देखील खोलवर झालेल्या वारामध्ये कापल्या होत्या. मानेवर, हातावर, तोंडावर आणि इतर ठिकाणी एकूण 16 वार करण्यात आले होते. चेहरा, छाती, दोन्ही हात आणि शरीराचा इतर भाग रक्ताने माखलेला होता.

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. मुंडे यांच्या अंगावर १६ वार आहेत. महादेव यांचा आगोदर गळा कापला. त्यातील एक वार हा २० सेमीपर्यंत लांब, ८ सेमी रूंद आणि ३ सेमी खोल असा होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले. विशेष म्हणजे प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमुद आहे. यामध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मीक कराडने फोन केला आणि तपास थांबवला असा थेट आरोप केला आहे.

शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न

महादेव मुंडे यांच्या शरीरावरील वाराने आरोपींची क्रूरता स्पष्ट होते. या मारहाणीमुळे महादेव मुंडे यांच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. श्वसननलिका कापली, रक्तवाहिन्या तुटल्या. डाव्या व उजव्या हाताला अंगठ्याजवळ, तळहातावर, मधल्या बोटाजवळ वार झाल्याचे अहवालात समोर आले आहे. खाली पडल्याने डावा गुडघा खरचटलेला आहे. महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

कुठे किती वार

  • महादेव मुंडेचा गळा कापला. मानेवर उजव्या बाजूला 4 वार
  • तोंडापासून कानापर्यंत 1 खोल वार
  • उजव्या हातावर तीन वार, डाव्या हातावर देखील तीन वार
  • तोंडावर एक वार, नाकावर एक वार, गळ्यावर तीन वार.
  • शरीरावर एकूण 16 वार केले