देवेंद्र फडणवीस आत्याच्या भूमिकेत, ते पोलिसांचे…; मनोज जरांगे यांची पुन्हा कडवट टीका

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis and Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. बीडमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस आत्याच्या भूमिकेत, ते पोलिसांचे...; मनोज जरांगे यांची पुन्हा कडवट टीका
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळावं, यासाठी लढा सुरू आहे.
| Updated on: Mar 09, 2024 | 4:29 PM

संजय सरोदे प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पिंपळवाडी, बीड | 09 मार्च 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एका अधिकाऱ्याला विचारले बोर्ड का काढत आहेत तर असे कळले हे आदेश गृहमंत्री देत आहेत. मराठ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत. देवेंद्र फडणवीस आता आत्याच्या भूमिकेत आहेत. पोलिसांचे कान फुकतील आणि मराठ्यांना अटक करा म्हणतील. देवेंद्र फडणवीस यांना बोललो ते काय ब्रम्हदेव आहेत का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.

फडणवीसांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस कायद्याचा आणि सत्तेचा वापर करत आहेत. आमचं आणि तुमचं शत्रुत्व नाही. आमची सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी घ्या. आम्हाला निवडणूक आणि राजकारण याहून काही देणं घेणं नाही. आम्ही सभेसाठी नऊशे ते हजार एकर जमीन हवी आहे. फडणवीस मराठ्यांच्या मुळावर उठला आहेत. भरती प्रक्रियेत 10 आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे, असं समोन जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आता माघार नाही- जरांगे

आमचे काय लाड केले? ओबीसीही आता तुमच्या विरोधात गेले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्या आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी घेणे देणं नाही. शत्रुत्व नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मला जेलमध्ये टाकलं तरी मी मागे हटत नाही. देवेंद्र फडणवीस… मी एक मेलो तरी हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

माझा समाज आज ताट सोडून उन्हात बसला आहे. आपण उन्हात ताळपल्या शिवाय मुलाला सावली भेटणार नाही. सरकारने समाजाची कदर करावी. सरकारने ओळखून घ्यावे मराठे तुमचा राजकीय सुफडा साफ करतील. घराघरातील लेकरे मोठे करायची असतील तर त्रास सहन करावे लागणार नाही. मराठ्यांना आरक्षण लागतंय. मी जरासं बोललो तर तुम्हाला इतके लागले. मग अंतरवालीमध्ये ज्या आई बहिणीवर गोळ्या घेतल्या हे तुम्हाला शोभते का? असा सवाल जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना केलाय.