धक्कादायक| आंदोलन सुरु असतानाच महिलेची डिलिव्हरी! अजूनही ठिय्या सुरुच, बीड जिल्हाधिकारी कार्यलयासमोरचा प्रकार!

| Updated on: Feb 04, 2022 | 11:25 AM

ग्राम पंचायत सदर महिलेच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी जागा देत नाहीये, असा त्यांचा आरोप आहे. ही जागा मिळावी, या मागणीसाठी 24 जानेवारीपासून मनीषा काळे या कुटुंबियांसोबत उपोषणाला बसल्या आहेत.

धक्कादायक| आंदोलन सुरु असतानाच महिलेची डिलिव्हरी! अजूनही ठिय्या सुरुच, बीड जिल्हाधिकारी कार्यलयासमोरचा प्रकार!
Follow us on

बीडः मागील दहा दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी (Beed Collector office) कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या गर्भवती महिलेची आंदोलन स्थळीच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा विकास काळे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला (Woman on Fasting) बसल्या होत्या. गुरुवारी सकाळी पहाटेच्या सुमारास तिला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. तिच्यासोबत कुटुंबीयदेशील होते. मात्र त्या अवस्थेतही ती आपल्या मागण्यांवर ठाम राहिली, रुग्णालयात जाण्यास नकार दिला. अखेर गुरुवारी पहाटेचार वाजता तिची प्रसूती झाली. त्यानंतरही महिला आणि तिच्या कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यलायसमोर ठिय्या (Beed Agitation) सुरुच आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काहीच कार्यवाही होत नाही, हा प्रकार संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

महिलेची मागणी काय?

बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात अप्पाराव पवार हे पारधी समाजातील व्यक्ती राहतात. आंदोलन करणारी महिला मनीषा विकास काळे ही त्यांची पुतणी आहे. मनीषा आणि तिचे पतीही अप्पाराव पवार यांच्यासोबत तेथेच राहतात. अप्पाराव यांना घरकुल योजनेअंतर्गत घराला मंजुरी मिळाली. मात्र ग्राम पंचायत त्यांना घर बांधण्यासाठी जागा देत नाहीये, असा त्यांचा आरोप आहे. ही जागा मिळावी, या मागणीसाठी 24 जानेवारीपासून मनीषा काळे या कुटुंबियांसोबत उपोषणाला बसल्या आहेत.

बाळ, बाळंतीण, कुटुंबीयांचा ठिय्या सुरूच!

दरम्यान, गुरुवारी पहाटे चार वाजता मनीषा यांची प्रसूती झाली. हा प्रकार काळाल्यानंतर 8 वाजता शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पीआय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णवाहिका घेऊन गेले. त्यांनी अप्पाराव पवार यांना बाळ आणि माता यांना रुग्णालयात पाठवा असे सांगितले. मात्र अप्पाराव, मनीषा आणि तिच्या पतीने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. बाळंतीण आंदोलनस्थळीच चबुतऱ्यावर आहे. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना; काँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी नेमकी काय?

ही सवय बनवेल तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती, दरमहिन्याला एक हजारांची बचतीतून व्हा करोडपती!