AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना; काँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी नेमकी काय?

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली. या प्रभाग रचनेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसला नुकसान होईल, अशी प्रभाग रचना केल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रभाग रचनेवर काँग्रेस नगरसेवक आक्षेप नोंदवणार आहेत.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना; काँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी नेमकी काय?
नागपूर प्रभाग रचनेचा नकाशा
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 9:47 AM
Share

नागपूर : नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) यापूर्वी चार सदस्यीय प्रभाग रचना होती. यंदा तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. त्यामुळे प्रभाग रचना कमी-जास्त प्रमाणात करण्यात आली. प्रभागाच्या नव्या रचनेत भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. शहर काँग्रेसच्या गुरुवारी देवडिया भवन (Devdia Bhavan ) येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेवर भाजपसह काँग्रेसमधूनही अनेक आक्षेप नोंदविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातील उत्तर व दक्षिण नागपूर सोडता काँग्रेसकरिता नवी प्रभाग रचना ही अनुकूल नाही. यासंदर्भात आक्षेप असल्यास काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thackeray) यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे आक्षेप नोंदविण्याचे सांगितले आहे. याव्यतिरिक्त आक्षेप नोंदविण्यासंदर्भात काँग्रेसकडून एक समिती गठीत करण्यात येणार आहे.

भाजपसाठी प्रभाग सोयीस्कर बनविल्याचा आरोप

या बैठकीत डिजिटल सदस्यता अभियानासंदर्भात माहिती देण्यात आली. प्रभाग स्तरावर निवडणुकीसंदर्भातील चर्चा झाली. नव्या प्रभाग रचनेसंदर्भात माजी व आजी नगरसेवकांकडून सूचना घेण्यात आल्या. नव्या प्रभाग रचनेत पूर्व नागपुरात पूर्वीच्या प्रभागांना तीन भागात विभाजित करण्यात आले. महाल येथे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे जुने घर, संघ मुख्यालय येथून अन्य प्रभाग हे भाजपकरिता सोयीस्कर बनविण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. आप्पा मोहिते व सुनील दहीकर यांनी यासंदर्भात मत व्यक्त केले. किशोर गीद यांनी दक्षिण नागपूर येथे रिजवान, पश्‍चिम व सुभाष मानमोडे, वीणा बेडगे यांनीही प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविले. आशीष दीक्षित यांनी प्रभाग तेरा संदर्भात माहिती दिली. यासंदर्भातील आक्षेप लवकरच नोंदविले जणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

जुने प्रभाग वेगवेगळ्या प्रभागात विभागले

नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक नगरसेवकांच्या सध्याचा प्रभागांचे विभाजन, त्रिभाजन झाले आहे. अर्थात जुने प्रभाग काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रभागात विभागले गेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा जाहीर करणे, आक्षेप, हरकती, सूचना मागविणे तसेच सुनावणी घेणे आदी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या प्रारूप अधिसूचनेवर चौदा फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर सोळा फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर केले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यामार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम दि. सव्वीस फेब्रुवारी 2022 असेल. प्रभागाची गणना उत्तरपासून पूर्व, पूर्वपासून पश्‍चिम, पश्‍चिमपासून दक्षिण आणि उत्तरच्या क्रमानुसार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभेत सात प्रभाग असतील. एका-एका विधानसभा क्षेत्रात 24 ते 25 नगरसेवक आहेत.

Vande Mataram | नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन, जाणून घ्या उद्यानाची काय राहणार विशेषता

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

गाडी चालवताना भीती वाटते? Simulator समोर बिनधास्त सराव करा, नागपूर RTO ची भन्नाट डोकॅलिटी

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.