AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भरला आठवडी बाजार, भाजीपालाही मोफत

प्रशासनाच्या याच निर्णयाचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील माजलगाव येथे एका शेतकऱ्यांने सर्व भाजीपालाच भिरकावून दिल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता आठवडी बाजाराला तरी किमान परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Beed : अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भरला आठवडी बाजार, भाजीपालाही मोफत
आठवडी बाजार सुरु करण्याच्या मागणीसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बाजार भरवण्यात आला होता.
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 4:08 PM
Share

बीड : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे (Maharashtra) राज्यभर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, इतर सर्व बाबींना सूट अन् आठवडी बाजारांनाच बंदी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाच्या याच निर्णयाचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील माजलगाव येथे एका शेतकऱ्यांने सर्व भाजीपालाच भिरकावून दिल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता आठवडी बाजाराला तरी किमान परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. भाजीपाला हा अत्यावश्यक आहे. नियम-अटी लादून तो सुरु ठेवावा या मागणीसाठी बीड येथील (District Administration) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Weekly Market) आठवडी बाजार भरविण्यात आला होता. शिवाय ये-जा करणाऱ्या नागरिकांना हा भाजीपाला मोफत दिला जात होता. वेगळ्या पद्धतीने रोष व्यक्त करुन किमान आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सार्वजनिक कार्यक्रम खुलेआम मग…

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वंच बाबींवर अंकूश येणे गरजेचे आहे. असे असताना आवश्यक असलेल्या आठवडी बाजाराला बंदी आणि राजकीय, सार्वजिनक कार्यक्रमांना मात्र, हजारो नागिराकांची गर्दी अशी अवस्था आहे. सोमवारीच एकीकडे सामाजिक कार्यकर्ते हे आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी करीत होते तर दुसरीकडे बिंदूसरा नदीवरील बंधाऱ्याच्या भूमिपूजनाला हजारोच्या संख्येने उपस्थिती होते. त्यामुळे आठवडी बाजाराला देखील परवानगी मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

24 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री यांनी केली आहे, त्यामुळेच जिल्हाप्रशासनाने अटी व नियमांसह आठवडे बाजारास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजलगाव येथील नगरपालिकेने भरलेला आठवडी बाजार उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकुन देण्यात आला त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळेच संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या आंदोलना दरम्यान केली आहे. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर ,सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, उपाध्यक्ष मराठवाडा उपाध्यक्ष आल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

राज्य सरकारची भन्नाट योजना : प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढणार फळबागेचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाचे नियोजन?

Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले आवकमध्ये चढ-उतार, शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला..!

Onion : काय सांगता? आवक वाढल्याने चक्क कांदा लिलावच बंद, लासलगाव कांदा मार्केटला टक्कर देणारी बाजारपेठ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.