Onion : काय सांगता? आवक वाढल्याने चक्क कांदा लिलावच बंद, लासलगाव कांदा मार्केटला टक्कर देणारी बाजारपेठ

Onion : काय सांगता? आवक वाढल्याने चक्क कांदा लिलावच बंद, लासलगाव कांदा मार्केटला टक्कर देणारी बाजारपेठ
भारत देशातून कांद्याची निर्यात वाढली आहे.

अवघ्या 15 दिवसांपूर्वीच सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 1 हजार 54 ट्रकच्या माध्यमातून 1 लाख 5 हजार 400 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. मात्र, त्यामागे कारण होते. सिध्देश्वराच्या यात्रे निमित्ताने येथील बाजारपेठ ही 3 दिवस बंद राहणार होती. त्यामुळे खरिपातील कांद्याची आवक वाढली होती.

रोहित पाटील

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 24, 2022 | 2:07 PM

सोलापूर : अवघ्या 15 दिवसांपूर्वीच सोलापूर येथील (Agricultural Produce Market Committee) सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 1 हजार 54 ट्रकच्या माध्यमातून 1 लाख 5 हजार 400 क्विंटल (Onion) कांद्याची आवक झाली होती. मात्र, त्यामागे कारण होते. सिध्देश्वराच्या यात्रे निमित्ताने येथील बाजारपेठ ही 3 दिवस बंद राहणार होती. त्यामुळे खरिपातील कांद्याची आवक वाढली होती. हे निमित्त असले तरी (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बाजारपेठ ठरत आहे. 24 जानेवारी रोजी पुन्हा 800 ट्रकच्या माध्यमातून कांद्याची आवक झालेली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा विक्रमी आवक झालेली आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने लिलाव हे रखडत आहेत. त्यामुळे उद्या (मंगळवारी) कांद्याचे लिलाव हे बंद राहणार आहेत. सध्या खरिपातील कांद्याची काढणी कामे सुरु आहेत. त्यामुळे आवक ही अशीच राहणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

तरीही दर सरासरी एवढाच

आवक वाढली की शेतीमालाचे दर कोसळले असेच चित्र असते मात्र, कांद्याला सध्याही सरासरीप्रमाणे दर मिळत आहे. कांद्याच्या दर्जानुसार 300 रुपयांपासून ते 3 हजारपर्यंत दर आहेत. पण सरासरी दर हा 1हजा 500 रुपये आहे. सध्याची कांद्याची काढणी कामे सुरु आहेत. शिवाय दोन दिवसांपासून सोलापूर सह मराठवाड्यात पुन्हा ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता कांद्याची काढणी-छाटणी झाली की थेट बाजारपेठ जवळ केली जात आहे. सध्या समाधानकारक दर आहे भविष्यात यामध्ये घसरण होईल या धास्तीने शेतकरी बाजारपेठ जवळ करीत आहेत.

मंगळवारी लिलाव बंद

कांद्याची मोठी आवक झाल्याने सोलापूरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदाच-कांदा पाहवयास मिळत आहे. 15 दिवसांपूर्वी देखील अशीच अवस्था झाली होती. मात्र, तीन दिवस व्यवहार बंद असल्याने तेव्हा गैरसोय झाली नव्हती पण आता अशीच आवक कायम राहिली तर लिलाव होणे मुश्किल होणार आहे. शिवाय सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कांद्याचे नुकसान आणि शेतकऱ्यांची गैरसोय होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Jalna : ‘सीड हब’मध्ये आता ‘सीड पार्क’, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नेमका फायदा काय ?

अभिनेता जॅकी श्रॉफचा लाख मोलाचा सल्ला ठरला शेतकऱ्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट, आता अडीच एकरामध्ये 70 पीकं

Pomegranate : मुख्य आगारातून डाळिंब बागा नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहेत कारणे?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें