अभिनेता जॅकी श्रॉफचा लाख मोलाचा सल्ला ठरला शेतकऱ्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट, आता अडीच एकरामध्ये 70 पीकं

शेती उत्पादनात कशामुळे वाढ होईल हे सांगता येत नाही. एकीकडे उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग एक ना अनेक उपक्रम राबवत आहे. असे असतानाही उत्पादनात वाढ होईलच असे नाही पण अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी एका शेतकऱ्याला दिलेला कानमंत्र एवढा उपयोगी ठरला आहे की, शेतकऱ्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफचा लाख मोलाचा सल्ला ठरला शेतकऱ्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट, आता अडीच एकरामध्ये 70 पीकं
अभिनेता जॅका श्रॉफ यांच्या बरोबर शेतकरी अविनाशसिंग डांगी
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 12:59 PM

मुंबई : शेती उत्पादनात कशामुळे वाढ होईल हे सांगता येत नाही. एकीकडे उत्पादन वाढीसाठी (Agricultural Department) कृषी विभाग एक ना अनेक उपक्रम राबवत आहे. असे असतानाही (Production) उत्पादनात वाढ होईलच असे नाही पण अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी एका शेतकऱ्याला दिलेला कानमंत्र एवढा उपयोगी ठरला आहे की, शेतकऱ्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले आहे.  याबबात खुद्द शेतकरी अविनाश सिहं यांनी सांगितले की, अभिनेता जॅकी श्रॉफ यांना भेटण्यासाठी मुंबईत पोहोचल्यावर त्यांना चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याकडून ही प्रेरणा मिळाली. तिथे जॅकी श्रॉफने त्याला विचारले की, तू काय करतोस, त्याने उत्तर दिले की मी एक शेतकरी आहे. (Organic Farm) यानंतर जॅकी श्रॉफ यांनी त्यांना सांगितलं की, पिकं लहान मुलांसारखी असतात आणि तुमच्या मुलांना रासायनिक खतं खाऊ घालू नका.

एवढ्याच सल्ल्याने सर्वकाही बदलून गेले. आपल्या आवडत्या अभिनेत्याने दिलेल्या सल्ल्याचे पालन करायचे म्हणून लागलीच त्यांनी सेंद्रीय शेती म्हणजे काय? याची माहिती काढण्यास सुरवात केली. सुरुवातीला अविनाशसिंग डांगी यांनी सेंद्रिय शेतीची माहिती गोळा केली. कृषी तज्ज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञांशी संपर्क साधून सेंद्रिय शेतीबद्दल बारिकसारिक माहिती घेतली. सुरवातीला अडचणी आल्या मात्र, आपल्या आवडत्या अभिनेत्याने सल्ला दिला म्हणल्यावर त्यासाठी कायपण करायची तयारी ठेऊन अविनाशसिंग यांनी सेंद्रीय शेतीच्या नव्या आयामाला सुरवात केली. आता 1 एकरामध्ये तब्बल 70 पीके त्यांनी घेतले आहेत.

अन् अविनाश सिंह डांगी यांचा शेती व्यवसयातील बदल

कृषी विषयक सल्ला, मार्गदर्शन हे केले जाते पण त्याची अंमबलबजावणीकडे मात्र, दुर्लक्ष होते. पण अविनाशसिंग यांनी हे करुन दाखवले आहे. अविनाशसिंग डांगी यांनी सेंद्रीय शेतीचे मॉडेल उभे केले असूनअवघ्या अडीच एकरात 70 वेगवेगळी पिके घेतली आहेत.

अविनाशसिंग यांनी जून 2021 मध्ये जैविक प्रणालीतून हे नवीन मॉडेल सुरू केले आणि जून 2022 पर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये त्यांनी 18 प्रकारच्या भाज्या, 32 प्रकारची फळं, 4 प्रकारची मसाल्याची पिकं लावली आहेत. 21 वाफ्यात वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेतले आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत कोथिंबीर, भुईमूग, उडीद, झेंडू ही स्वीट कॉर्नची पिके आहेत. या अडीच एकरामध्ये त्यांनी 32 प्रकारची पिके घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. बहुस्तरीय, बहुपीक, फळांचे जंगल, कुटुंबशेतीचे मॉडेल तयार करण्यात आल्याचे अविनाशसिंग डांगी यांनी स्पष्ट केले.

या क्षेत्रात त्यांनी जमिनीच्या आतून वरपर्यंत 6 ते 5 थरांमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आहे. अशा मॉडेलमध्ये कुटुंबाच्या गरजेनुसार प्रत्येक फळभाज्या प्रत्येक हंगामात उपलब्ध राहणार आहेत. याचे नियोजन करुनच पिकांची लागवड करण्यात आली आहे तर याकरिता ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.

उत्पादनात वाढ अन् इतरांसाठी प्रेरणादायी

अविनाशसिंग डांगी यांनी सांगितले की, शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशके याचा अजिबात वापरत नाहीत. केवळ गांडूळ-कंपोस्टच्या पानांपासून सेंद्रीय कीटकनाशके तयार करतात. दाट जैव-सेंद्रीय, तर जंगली सातफनी अर्क जे जनावरे खात नाहीत अशा वनस्पतीचे जतन त्यांनी केले आहे. जुन्या पद्धतीने शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना शेतीत जास्त खर्च आणि नफा कमी मिळत आहे. मात्र, शेतामध्ये काही वेगळे करुन उत्पादन वाढवायचे असेल तर शेतकरी अविनाशसिंग डांगी यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेतीचे नवे मॉडेल सुरू करू शकतात. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होणार आहेच पण पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही.

संबंधित बातम्या :

Pomegranate : मुख्य आगारातून डाळिंब बागा नामशेष होण्याच्या मार्गावर, काय आहेत कारणे?

निसर्गाचा लहरीपणा कायम : बदलत्या वातावरणाचा परिणाम आता थेट रब्बीच्या उत्पादनावरच

राज्यस्तरीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.