निसर्गाचा लहरीपणा कायम : बदलत्या वातावरणाचा परिणाम आता थेट रब्बीच्या उत्पादनावरच

निसर्गाचा लहरीपणा कायम : बदलत्या वातावरणाचा परिणाम आता थेट रब्बीच्या उत्पादनावरच
रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले तर आता हे संकच रब्बी हंगामातही कायम राहिलेले आहे. पेरणीपासून रब्बी हंगामातील पिकांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. सुरवातील अवकाळी पाऊस त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता पोषक असलेली थंडी देखील रब्बी हंगामातील पिकांना बाधित होत आहे.

जितेंद्र बैसाणे

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 24, 2022 | 11:09 AM

नंदुरबार : निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून सध्याच्या रब्बी हंगामातही अनुभवयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले तर आता हे संकच रब्बी हंगामातही कायम राहिलेले आहे. पेरणीपासून रब्बी हंगामातील पिकांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. सुरवातील अवकाळी पाऊस त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता पोषक असलेली थंडी देखील रब्बी हंगामातील पिकांना बाधित होत आहे. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस फोल ठरत आहे. आता पर्यंत पिकाचे नुकसान झाले तरी ते औषध फवारणीमधून सावरता येत होते. पण आता फळधारणा झालेल्या पिकावरच परिणाम होत असल्याने हे न भरुन निघणारे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रब्बी हंगामातील पिकांना थंडी ही पोषक असते मात्र, गेल्या महिन्याभरापासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे थंडी देखील बाधित ठरत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पारा 4 अंशावर

दर 15 दिवसांनी वातावरणातील बदलाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्या जोमात पिकांची वाढ होते त्यास अडथळा निर्माण होत असून याचा थेट उत्पादनावर परिणाम होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील डोंगर रांगात तापमान 5 अंशापर्यंत खाली आले आहे. तर सपाटी भागात तापमान 7 अंश सेल्सिअस ची नोंद करण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे वाढ खुंटली असून आता फळधारणा होण्याप्रसंगीच निसर्गाचा लहरीपणा पुन्हा धोकादायक ठरत आहे. सध्याच्या नुकसान हे न भरुन निघणारे आहे.

अधिकचा खर्च करुनही, पिकाचे भवितव्य अंधारात

गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात नेहमी बदल झालेला आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी तर दिवसभर ऊन असे पोषक वातावरण असताना आता दिवसभर ढगाळ वातावरण आणि सकाळ-संध्याकाळ थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. एकीकडे उत्पादनात घट होत असताना वाढत असलेला खर्च ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झाले तर आता ढगाळ वातावरणाचा धोका रब्बी हंगामातील पिकांवर कायम आहे.

हरभरा फुलोऱ्यात असतानाच तीन वेळी फवारण्या

यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा या पिकाचा पेरा झालेला आहे. उत्पादनाची सर्व मदार आता याच पिकावर आहे. दोन महिन्यापूर्वी पेरणी झालेला हरभरा आता फुलोऱ्यात आला आहे. असे असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा औषध फावरणी करावी लागलेली आहे. उत्पादन पदरी पडेपर्यंतच अधिकचा खर्च होतो पण वातावरणातील बदलामुळे उत्पादन मिळेलच असे नाही. यापूर्वी खरिपात जे झाले तीच स्थिती रब्बी हंगामाची होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यस्तरीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला, वाचा सविस्तर

Rabi Season : खरिपापाठोपाठ रब्बीचेही स्वप्न भंगले, शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें