राज्यस्तरीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला, वाचा सविस्तर

राज्यस्तरीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्रात सर्वाधिक हळद लागवड ही हिंगोली जिल्ह्यात केली जाते. शिवाय लागवडीबरोबरच येथील बाजारपेठेतील चोख व्यवहारामुळे सबंध मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्याच अनुशंगाने हळद निर्यातीसाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पोषक वातावरण आहे. याच वातावरणाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले तर निर्यातीची मोठी संधी आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 24, 2022 | 10:29 AM

हिंगोली : महाराष्ट्रात सर्वाधिक हळद लागवड ही हिंगोली जिल्ह्यात केली जाते. शिवाय लागवडीबरोबरच येथील बाजारपेठेतील चोख व्यवहारामुळे सबंध (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्याच अनुशंगाने हळद निर्यातीसाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पोषक वातावरण आहे. याच वातावरणाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले तर निर्यातीची मोठी संधी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन (Agriculture Minister Dada Bhuse) कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. (turmeric) हळदीच्या उत्पादनापेक्षा त्याचे मूल्यावरच दर हे अवलंबून असते. त्यामुळे सध्या प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादनवाढीची संधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना असल्याचे हळद परिषदेत सांगितले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय हळद परिषदेत त्यांनी हा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

हळद नगदी पीक मात्र, काढणीपश्चात खर्चावर अंकूश गरजेचा

हळद परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे या कृषी विद्यापीठाच्या अनोख्या उपक्रमातून कृषी विभागालाही मार्गदर्शन ठरतील असे मुद्दे समोर येत आहेत. या परिषदेच्या माध्यमातून हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अहवालाची धोरणे आखण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादनही राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. सध्या हळदीच्या मागणीत वाढ झाली असून उत्पादन घटले आहे. अशाच परस्थितीमध्ये संधीचे सोने करणे गरजेचे आहे. नगदी पिकांच्या काढणी नंतर होणाऱ्या खर्चावर निर्बंध येणे गरजेचे आहे. यातून खर्च वाचला तरच निर्यातीमधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असल्याचा सल्ला भुसे यांनी दिला आहे.

परभणी विद्यापीठाकडे हळदीचे 15 वाण

परभणी विद्यापीठाकडे हळदीचे 15 वाण आहेत. विद्यापीठाअंतर्गत उत्पादन वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न महत्वपूर्ण असून येथील हळदीला भौगोलिक मानांकन मिळणे गरजेचे आहे. राज्यात सुमारे 5 हजार 500 गावांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक सहभाग हा हिंगोली जिल्ह्याचा राहिलेला आहे, त्यामुळे येथील हळदीचे वेगळेपण असून मानांकनासाठी योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अॅड. शिवाजी माने यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत ऑनलाईन राज्यस्तरीय हळद परिषद पार पडली. या दरम्यान, उत्पादन वाढीबरोबर दर्जा सुधारण्याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.

संबंधित बातम्या :

Rabi Season : खरिपापाठोपाठ रब्बीचेही स्वप्न भंगले, शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

किवी फळाच्या शेतीपासून घेता येते लाखोंचे उत्पन्न, जगभरात मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें