AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : खरिपापाठोपाठ रब्बीचेही स्वप्न भंगले, शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले

निसर्गाचा लहरीपणा रब्बी हंगामातही कायमच राहिलेला आहे. ज्या हरभरा पिकाचा सर्वाधिक पेरा या हंगामात झालेला त्याच पिकावर वातावरणातील बदलाचा फटका बसलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील येनंदापेंदा शिवारातील हरभरा पीक बहरले पण फळधारणाच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने उभ्या हरभरा पिकावरच कुळव घातला आहे.

Rabi Season : खरिपापाठोपाठ रब्बीचेही स्वप्न भंगले, शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले
वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकाचे नुकसान झाले आहे. हरभरा पिकाळा फळधारणाच झाली नसल्याने त्याची काढणी करुन पीक फेकून देण्यात आले आहे.
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 9:48 AM
Share

नांदेड : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. पण (Rabi Season) रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामातू भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्रस निसर्गाचा लहरीपणा रब्बी हंगामातही कायमच राहिलेला आहे. ज्या हरभरा पिकाचा सर्वाधिक पेरा या हंगामात झालेला त्याच पिकावर (Change Climate) वातावरणातील बदलाचा फटका बसलेला आहे. (Marathwada) नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील येनंदापेंदा शिवारातील हरभरा पीक बहरले पण फळधारणाच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने उभ्या हरभरा पिकावरच कुळव घातला आहे. पेरणीपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपसणा करुनही पिकाची ही अवस्था झाल्याने शिवाजी बोईनवाड शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हरभरा पिकावर वखर फिरवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढायचे तर सोडाच पण उत्पादनावर झालेला खर्चही काढणे आता मुश्किल झाले आहे.

हरभरा पिकाचे विक्रमी क्षेत्र

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. गहू, ज्वारी या मुख्य पिकांची जागा यंदा हरभरा पिकाने घेतली आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि हंगामाच्या सुरवातीला असलेले पोषक वातावरण यामुळे हा बदल झाला होता. शिवाय कृषी विभागाकडूनही याबाबत जनजागृती केली होती. त्यामुळेच मराठवाड्यात यंदा प्रथमच हरभऱ्याचे क्षेत्र हे वाढलेले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिली असून मुख्य पीक असलेले ज्वारी यंदा तिसऱ्या क्रमांकावर गेलेली आहे. पेरणीपासून उत्पदानात वाढ होईल या अुनशंगानेच शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत मात्र, निसर्गाचा लहरीपणा खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही पाहवयास मिळत आहे.

अवकाळी, गारपीट अन् आता ढगाळ वातावरण

निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही करावा लागत आहे. पेरणी होताच झालेल्या अवकाळी पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. आता कुठे पिके बहरात असतानाच गारपिटमुळे पिकांचे नुकसान झाले होते. फळधारणा होण्याप्रसंगीच वातावरणातील बदलामुळे न भरुन निघणारे नुकासान झाले आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण झाल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच शिवाजी बोईनवाड यांनी हरभरा पिकांवर वखर फिरवली आहे.

म्हणे, एकाच पीक पध्दतीमुळे शेतकऱ्याचे नुकसान

रब्बी हंगामातील पेऱ्यापासून आतापर्यंत अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. यामुळे हरभरा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे घाटे लागण्याच्या अवस्थेतच पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ही फळधारणा केवळ एकाच पीक पद्धतीमुळे झाले असल्याचा निर्वाळा कृषी विभगाने दिला आहे. त्याच पिकाचा पेरा दरवर्षी केल्यामुळे फळधारणा झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे तर बांधावरची स्थिती काही वेगळीचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

किवी फळाच्या शेतीपासून घेता येते लाखोंचे उत्पन्न, जगभरात मागणी

पारंपरिक धानशेतीला फाटा देत 13 एकरात शंभरावर नगदी पिकांचे घेतले उत्पादन, गोंदिया जिल्ह्यातील प्रयोग

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.