AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचे नाव घेईना. मागील वर्षी राज्य सरकारकडून दोन वेळा कर्जमाफीही देऊनही शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थेच आहेत. महाराष्ट्रात 2021 मध्ये 11 महिन्यात 2 हजार 948 शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली आहे.

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन
Farmers suicide
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 8:10 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रात (Maharashtra) शेतकऱ्यांच्या (Farmers) आत्महत्येचं (Suicide) सत्र काही थांबायचे नाव घेईना. मागील वर्षी राज्य सरकारकडून दोन वेळा कर्जमाफीही देऊनही शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थेच आहेत. महाराष्ट्रात 2021 मध्ये 11 महिन्यात 2 हजार 948 शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर 2020 मध्ये कर्जबाजारीपणामुळे 2 हजार 547 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी महसूल विभागाने सांगितले आहे की, कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होत नाहीत. 2021 च्या जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद विभागात 804 तर नागपूर परिसरात 309 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर कोकणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली नाही.

विदर्भात परिस्थिती भयानक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सगळ्यात जास्त प्रमाण विदर्भात आहे. तेथील अमरावती जिल्ह्यामध्ये 331 तर यवतमाळमध्ये 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जितेंद्र घाटगे यांनी माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागितल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून योजना राबविण्यात आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मानसिकता बदलणे काळाची गरज

कृषीतज्ज्ञांच्या मते कर्जमाफीच्या पर्यायापेक्षा शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. दिवाळखोरीत निघालेल्या शेतकऱ्यांसाठी योजना राबविणे महत्वाचे आहे. तर शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील ज्ञानदेव तालुले यांच्या मते मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची परिस्थितीत फरक पडणार आहे.

शेतकऱ्यांच्या समस्याही कायम स्वरूपी त्याच आहेत कधी मानवरूपी तर कधी नैसर्गिक संकटाचा सामना ही ठरलेलाच आहे. यावर्षीही प्रमाणपेक्षाही पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेल्या शेतातील पिकावर नांगर फिरवावा लागला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. कर्जाचा डोंगर असतानाच शेतातील पिकांवर कधी रोग पडतो तर कधी पुराचे पाणी शेतात घुसते. त्यामुळे कर्ज काढून झालेल्या पेरण्या तशाच पाण्यात सोडून द्यावा लागत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतकरी हातबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी योजना राबवणे गरजेचे असल्याचे मत कृषीतज्ज्ञ व्यक्त करतात.

संबंधित बातम्या

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट

36 जिल्हे 72 बातम्या | 36 district 72 News | 23 January 2022

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.