Pankaja Munde | विडा रंगला ओठी, पंकजा मुंडेंनी टपरीवर उभं राहून स्वतःसाठी बनवलं खास पान!

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्वत: पानपट्टीवर पानाचा विडा (Paan) बनवून खाल्ला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

Pankaja Munde | विडा रंगला ओठी, पंकजा मुंडेंनी टपरीवर उभं राहून स्वतःसाठी बनवलं खास पान!
पंकजा मुंडेंनी पानाचा विडा बनवला

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्वत: पानपट्टीवर पानाचा विडा (Paan) बनवून खाल्ला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

पाहा पंकजा मुंडेंचा पान बनवतानाचा व्हिडीओ –

पंकजा मुंडे रविवारी परळी शहरात होत्या. एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे पान टपरीला भेट देण्याचा आग्रह धरला. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्या त्याच्या पान टपरीवर गेल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी स्वतः खाण्यासाठी स्वतःच पानाचा विडाही बनविला.

विड्याला लागणारे साहित्य देखील पंकजा मुंडेंनी स्वतः घेतले आणि पानाचा विडा तयार करत पान खाल्ला. पानाचा विडा बनवून खातानाचा पंकजा मुंडेंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

यावेळी, पान टपरीवरील कार्यकर्ते त्यांना पानाची विडा कसं बनवायचं त्यात काय घालायचं हे सांगताना दिसत आहेत. तर, पंकजा मुंडे त्यांच्या आवडीनुसार त्यांना हव्या असलेल्या गोष्टींनी पानाचा विडा बनवत आहेत. पानाचा विडा बनवून झाल्यानंतर त्यांनी त्याचा आस्वादही घेतला.

संबंधित बातम्या :

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

संकटातले संधीसाधू! सरकारनं कोरोना काळात फक्त खजाने भरले, महाविकास आघाडीवर विरोध पक्ष नेते फडणवीसांचा आरोप

Published On - 2:06 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI