Dhananjay Munde : जरांगे जी… या सर्व गोष्टी महागात पडणार, कर्मा रिपीट, जेवढं… धनंजय मुंडेंचा सूचक इशारा; काय म्हणाले?

Dhananjay Munde on Manoj Jarange : तर आजचा दिवस मनोज जरांगे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शाब्दिक युद्धाचा होता. पण जरांगेंनी त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. तर मुंडेंनी धुवांधार बॅटिंग करत त्यांना कर्माची आठवण करून दिली. काय म्हणाले धनुभाऊ?

Dhananjay Munde : जरांगे जी... या सर्व गोष्टी महागात पडणार, कर्मा रिपीट, जेवढं... धनंजय मुंडेंचा सूचक इशारा; काय म्हणाले?
धनंजय मुंडेंचा पलटवार
| Updated on: Nov 07, 2025 | 2:59 PM

Dhananjay Munde demand Narco Test : आजचा दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील खळबळजनक आरोपाने गाजला. धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर दुपारी धनंजय मुंडे यांनी त्यावर जोरदार बॅटिंग केली. त्यांनी सडेतोड उत्तर देतानाच जरांगेंच्या भाषेवर आणि सरकारच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडेंनी धुवांधार बॅटिंग करत त्यांना कर्माची आठवण करून दिली. काय म्हणाले धनुभाऊ?

म्हणून आम्ही राग गिळला

यावेळी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या भाषेविषयी मुंडे यांनी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढायची. भुजबळांची आयमाय काढायची. आमचा तर जपच आहे. पंकजा ताईंना काहीही बोलतात. घरात इंग्रज आले होतो का. ही का पद्धत आहे का बोलायची. आपल्या आयबहिणीला बोलल्यावर राग येणार नाही का. आम्ही राग गिळलाय. आम्ही गप्प बसलो. कारण मराठा आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका होती, असे धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस यंत्रणा जरांगेंना घाबरून

यावेळी मुंडेंनी मोठा आरोप केला. मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल. पण इथली पोलीस यंत्रणा कोणत्याही जाती धर्माचे असो यांना घाबरून आहे. म्हणूनच कर्ते करवते तेच आहेत. सर्वांचाच टार्गेट धनंजय मुंडे का. एवढ्या जणांना मी आवरला जात नाही का. कमाल आहे, असा चिमटा त्यांनी काढला. त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्याचा राग आला की मी चष्मा पाठवला नाही याचा राग आला, असा टोलाही मुंडे यांनी जरांगेना लगावला.

माझ्यापासून संमद्या पृथ्वीतलाला धोका आहे असं समजा. मी काय कोव्हिड व्हायरल झालो काय आता. एका मंत्र्याला माझ्यासापासून धोका असल्याचे काही बोलत आहेत. ऑन एअर ते संवैधानिक पदावरील मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत ऑन एअर कुणाचीही आयमाय काढतात. सरकार काही करत नाहीत. आम्ही काय एवढे बुळे नाहीत. या सर्व गोष्टी न समजायला अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

जरांगेजी महागात पडणार

यावेळी धनुभाऊंनी जरांगेंना एक मोठा इशाराही दिला. म्हणे माझं फोनवर बोलणं झालं. चोवीस तास सुरू असतो. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्या गरीबांना अडचण आली तर ते माझा फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी फोन सुरू ठेवतो. त्यात मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो का. त्यांना संपवण्यासाठी बोललो का. या सर्व गोष्टी जरांगे जी महागात पडणार आहे. कर्मा रिपीट. तुम्ही जेवढं खोटं कराल. तेवढं ते मागे फिरेल, असा इशारा मुंडे यांनी जरांगेंना दिला.