
बीडः महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद आता प्रचंड पेटला आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्याने हा वाद पुन्हा आता चिघळला आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटकात मालवाहतून करणाऱ्या वाहनांची झालेली तोडफोडीवरूनही राजकारण तापले आहे.
त्यामुळे आता सीमावादातील समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री गेल्या दोन दिवसापूर्वी खूप काही बोलत होते. मात्र बोमई यांच्या तोडीस तोड आमच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
दोन्ही राज्यातील सीमावादावर समन्वयक मार्गाने केंद्राने पर्याय काढावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले. यावेळी ते म्हणाले की, सीमावादावर आमचे मुख्यमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याकडे समन्वयक मंत्री पदाचा कार्यभार दिला आहे.
त्यामुळे आम्ही कर्नाटक दौऱ्यावर लवकरच जाणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. केंद्र सरकारला भेटीवर आणि कर्नाटक दौरा काढणार आहे.
मात्र आमच्या जाण्यावर कर्नाटक सरकारने व्यत्यय आणला आहे. तरीही आमच्या सरकारतर्फे आम्ही लवकरच सीमा भागात दौरा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यातील सीमावादावरून राजकारण तापलेले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारवर ईडीच्या कारवाईवरूनही जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना त्याविषयी वारंवार विचारणाही केली जात आहे. त्यामुळे आजही मंत्री शंभूराज देसाई यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात कोणी याचिका दाखल केली आहे. त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी कोणी याचिका दाखल केली ते माहीत नसल्याचे सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारवर ईडी आणि सीमावादावरून आता जोरदार टीका होत असली तरी याविषयी तोडगा कधी निघणार असा सवाल महाराष्ट्रातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
त्याच बरोबर सीमाभागाती नागरिकांनही यावर लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशाराही महाराष्ट्र सरकारला देण्यात आला आहे.