Manoj Jarange: मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी; सोशल मीडियावर कराड समर्थकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Threat to shoot Manoj Jarange: बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे यांना गोळा घालणार असल्याचा दावा एका ऑडियो क्लीपमध्ये करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लीप सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. काय आहे या क्लीपमध्ये तो मोठा दावा?

Manoj Jarange: मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी; सोशल मीडियावर कराड समर्थकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
मनोज जरांगे पाटील, वाल्मिक कराड
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 2:18 PM

अशोक काळकुटे/प्रतिनिधी: बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार करण्याचा दावा एका ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लीपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मनोज जरांगे समर्थक आणि वाल्मिड कराड समर्थकांमधील (Call Recording Goes Viral on Social Media) हे संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कॉल रेकॉर्डिंग ची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. काय आहे या ऑडिओ क्लिपमधील संभाषण?

जरांगेंना जीवे मारण्याची धमकी

या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेण्यात आले आहे.ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. कॉल रेकॉर्डिंग मध्ये एक व्यक्ती दुसर्‍या समर्थकाला बोलत आहे. त्यात तो मनोज जरांगे यांना मी गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देतो. त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणायचे नाही नसता तुलाही जिवे मारतो अशी जरांगे समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी कराड समर्थक देतो.

वाल्मीक कराड समर्थक आणि जरांगे समर्थकांमध्ये झालेले संभाषण

जरांगे समर्थक: पाटलांना काय करणार ?

कराड समर्थक : मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या मी स्वत: गोळ्या घालतो.

जरांगे समर्थक: तू घालणार आहेस का?

कराड समर्थक: स्वत: घालतो गोळ्या

जरांगे समर्थक: काय करणार आहेस तू पाटलांना?

कराड समर्थक: मी तर मनोज जरांगे यांना जीवच मारतो.

जरांगे समर्थक: बरं चालतंय बर

मनोज जरांगे यांच्यासह जरांगे समर्थकाला फोन द्वारे धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेऊन धमकावले. तर जरांगे समर्थकालाही मारण्याची धमकी दिली. या नवीन ऑडिओ क्लीपमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या दोन व्यक्ती नेमक्या कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंडे यांनी आपला खून करण्याची सुपारी दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. याप्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली होती. पण पुढे या प्रकरणात काय झाले याची अपडेट समोर आले नाही.