AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde | ‘भाऊ माझा पाठीराखा’, पंकजा मुंडे यांच्या अडचणीच्या काळात धनंजय मुंडे धावून जाणार

पंकजा मुंडे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहेत. त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर 1200 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी यूनियन बँकेने जप्तीची कारवाई केलीय. त्यानंतर आता जीएसटी विभागानेदेखील जप्तीची नोटीस पाठवलीय. यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Pankaja Munde | 'भाऊ माझा पाठीराखा', पंकजा मुंडे यांच्या अडचणीच्या काळात धनंजय मुंडे धावून जाणार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 27, 2023 | 4:14 PM
Share

अक्षय कुडकेलवार, Tv9 मराठी, बीड | 27 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहेत. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून जप्तीची नोटीस पाठवण्यात आलीय. कारखान्याने तब्बल 19 कोटींचा जीएसटी कर चुकवला नसल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जीएसटी विभागाची ही फक्त नोटीस नसून कारवाईच आहे, असं स्वत: पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आपल्याला अडचणींच्या काळात केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही. इतर सर्व साखर कारखान्यांना मदत मिळाली. केवळ आपल्या कारखान्यांना मदत मिळाली नाही, असं म्हणत पंकजा यांनी नाराजी व्यक्त केलीय. या सर्व घडामोडींनंतर आता पंकजा यांच्या मदतीसाठी त्यांचे भाऊ मंत्री धनंजय मुंडे धावून जाणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांचा कारखाना वाचवण्यासाठी भावाने कंबर कसली आहे. कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्याबाबत सांगण्यात येणार आहे. या विषयावर धनंजय मुंडे स्वत: पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडे नेमकी काय मदत करणार?

छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी आयुक्तांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या कारखान्याचा 19 कोटींचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी वसुली आणि जप्तीची नोटीस पाठवली आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासकीय स्तरावर कारखान्यासाठी काय केलं पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे कारखान्याचे पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

धनंजय मुंडे स्वत: आज किवा उद्या पंकजा मुंडे यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. धनंजय मुंडे हे सुद्धा गेल्या काही काळापासून वैद्यनाथ साखर कारखान्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्यासुद्धा भावना या कारखान्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, याला त्यांच्या व्यवसायिक दृष्टीकोनापेक्षा भावनिक कारण जास्त आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मदतीला धनंजय मुंडे धावून जाणार आहेत.

पंकजा मुंडे यांना या कारखान्याबाबत काही पदाधिकाऱ्यांकडून काही चुकीची माहिती दिली जात असेल तर त्याबाबत योग्य माहिती दिली जाणार आहे. राज्य सरकार म्हणून काय केलं जायला पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?