Pushpa fever : राजकारण्यांनाही चढला पुष्पाचा ज्वर, आता बीडचे संदीप क्षीरसागर म्हणतायत…

अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील डायलॉग सध्या सुपर हिट झाले आहेत. या चित्रपटाची क्रेझ काही कमी होत नाही. 'मैं झुकेगा नहीं' हा यातला डायलॉगही लोकप्रिय झालाय. राजकारणी संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

Pushpa fever : राजकारण्यांनाही चढला पुष्पाचा ज्वर, आता बीडचे संदीप क्षीरसागर म्हणतायत...
सभेत भाषण करताना राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 1:44 PM

बीड : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील डायलॉग सध्या सुपर हिट झाले आहेत. डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची क्रेझ कमी होत नाही. यातील डायलॉग्स आणि गाण्यांवर तर रोजच रील्स बनवले जातात. सोशल मीडियावर आपण ते पाहत असतो. शॉर्ट व्हिडिओ तयार होतात. त्यातही प्रत्येकजण आपलं काहीतरी वेगळं असावं म्हणून व्हॅल्यू अॅडिशन करत असतो. यूझर्सना ते आवडलं की मग ते व्हायरल होतं. लोक त्याला लाइक्स करायला लागतात. या सिनेमातलं श्रीवल्ली गाणं तसंच आहे. यावर आतापर्यंत किती रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ झाले असतील, हे मोजणंही कठीण आहे. तर दुसरीकडे ‘मैं झुकेगा नहीं‘ हा या सिनेमातला डायलॉगही लोकप्रिय झाला आहे. राजकारणी संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

राजकारण्यांनाही भुरळ

तरुणाईला या सिनेमातल्या गाण्यांप्रमाणंच डॉयलॉग्सनीही भुरळ घातलीय. आता याच डायलॉगची भुरळ राजकीय पुढार्‍यांनादेखील पडलेली दिसते. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर यांनी ऐ… मैं, झुकेगा नहीं, असं म्हणताच समोर बसलेल्या जमावातून मोठा जल्लोष झाला. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. काय म्हणतात नेमकं संदीप क्षीसागर पाहू या या व्हिडिओच्या माध्यमातून…

‘सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत’

या निवडणुकीत सर्व एकत्र येवून लढणार, पण मला काहीही फरक पडत नाही. माझ्यासोबत तरूण आहेत, वडीलधारी मंडळी, माता भगिणी आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. वेळ मिळत नाही मात्र पुष्पा हा सिनेमा पाहिला. त्याप्रमाणंच मीही म्हणतो मैं झुकेगा नहीं, असं ते उपस्थितांसमोर म्हणाले. आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पाहा व्हिडिओ –

आणखी वाचा :

Video : अनोखी वरात! शेतकरी पुत्राची वडस्कर कुटुंबानं काढली ट्रॅक्टरवरून वरात, यवतमाळातल्या लग्नाची चर्चा

Viral Video : हजारो फूट उंचीवर जोडप्याचा Romance; असा साजरा केला #kissday

दास्तां–ए–मासूमियत..! चिमुरड्याचा ‘हा’ Video पाहून येणार लहानपणीची आठवण, तुम्ही केलंय का असं कधी?