
हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षण (obc reservation) संपणार अशा निराशेतून शेतकरी निवृत्ती यादव यांनी जीवन संपवल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील शेतकरी निवृत्ती यादव यांनी मराठा समाजाला कुणबीपत्र वाटप वाटप केल्यामुळे ओबीसी समाजाचा आरक्षण गेले म्हणून या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. निवृत्ती यादव यांच्या कुटुंबीयांशी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांत्वनपर भेट दिली. तर वांगदरी येथील भरत कराड यांनी हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. त्याही कुटुंबियांना पंकजा मुंडे यांनी भेट दिली.
नातवाला नोकरी लागणार नाही ही चिंता
निवृत्ती यादव यांना नातवाच्या नोकरीची चिंता होती. बर्दापूर गावातील पारावर ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेट याविषयीची चर्चा होते. त्यावेळी यादव सुद्धा हजर राहत. आता आपल्या नातवाला नोकरी लागणार नाही ही चिंता त्यांना सतावत होती. ओबीसी आरक्षण संपल्यामुळे त्याला नोकरी लागणार नाही अशी चिंता त्यांना होती. या नैराश्यातून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेतला आणि जीवन संपवले. यापूर्वी जिल्ह्यातील नाथापूर गावातील गोरख देवडकर यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण जाण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली होती.
कोणीही कच खाऊ नका
दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी मयत कराड आणि यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आज माझ्या मतदारसंघांमध्ये बर्दापूर या गावांमध्ये मिळालेली आहे. एका माळी समाजाच्या अत्यंत चांगल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांच्या घरच्यांशी चर्चा केली त्यांचं म्हणणं आलं की त्यांनी थोडी कच खाल्ली. आता अधिकाऱ्यांशी चर्चा करेल अजून अधिक ची माहिती घेईन परंतु तिकडे मी वांगदरीला भरत कराड यांच्या परिवाराला भेटले मी एवढंच सांगेन माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही कच खाऊ नका. या गोष्टी करणाऱ्यांना सोडून द्या संघर्षासाठी तयार राहा, असे आवाहन मुंडे यांनी केले. अशी चुकीचे पाऊल उचलू नका. आपला जीव देऊ नका. आपल्या माघारी आपला परिवार असतो त्यांचे पण आपली जबाबदारी आहे यामुळे आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होत असतो. काहीही कुणाला अडचण येणार नाही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. अशाच प्रकारचे निर्णय होतील हा मला पूर्ण विश्वास आहे, असे मुंडे म्हणाल्या.