AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट? e-kyc चे आदेश धडकले, कुठे आणि कशी करणार प्रक्रिया, एका क्लिकवर जाणून घ्या

Ladki Bahin Yojana e kyc : लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आता सरकारने ईकेवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. कशी करणार ही प्रक्रिया?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट? e-kyc चे आदेश धडकले, कुठे आणि कशी करणार प्रक्रिया, एका क्लिकवर जाणून घ्या
लाडकी बहीण योजना
| Updated on: Sep 19, 2025 | 9:35 AM
Share

गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये मोठ्या दणक्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या लाटेत महायुतीचे सरकार भरघोस मतांनी निवडून आले. पण त्यानंतर या योजनेत सातत्याने नवनवीन निकष लागू करण्यात येत आहेत. या नवीन निकषांनी सरसकट अंमलबजावणीचे आदेश कधीच मागे टाकले आहेत. या योजनेत काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचे तसेच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर आता सरकारने या योजनेसाठी निकषांची जंत्रीच सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आता सरकारने ईकेवायसी (ladki bahin yojana ekyc) अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. कशी करणार ही प्रक्रिया?

ई-केवायसीसाठी इतकी मुदत

लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अर्थात ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. कारण आता सणासुदीचे दिवस आहेत. महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यामुळे पात्र महिलांनी फार काळ ही प्रक्रिया रेंगाळत न ठेवता तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी.

अशी करा e-kyc

  • महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल. त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • या योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
  • या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल.
  • ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यासाठी संकेतस्थळावर लवकरच पॉपअप विंडो सुरू होण्याची शक्यता आहे.
  • ही प्रक्रिया सोपी आहे. जसे ही प्रक्रिया सुरू होईल. तशी ईकेवायसी पूर्ण करा. नाहीतर नंतर गर्दी उसळेल आणि साईटवरी ताण येईल
  • पुढील मनस्ताप टाळण्यासाठी आणि योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करा
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.