“कुणासमोर झुकणार नाही!”, गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी पंकजा यांचं कार्यकर्त्यांना संबोधन

| Updated on: Dec 12, 2022 | 1:27 PM

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना संबोधन...

कुणासमोर झुकणार नाही!, गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी पंकजा यांचं कार्यकर्त्यांना संबोधन
Follow us on

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde Birth Anniversary) याची आज जयंती आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जात त्यांना अभिवादन केलं. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) भावूक झाल्या.

पंकजा मुंडे यांनी कार्यककर्त्यांना संबोधित करताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या. गोपीनाथ मुंडे यांनी कायम लोकांच्या कल्याणासाठी काम केलं.ते श्रीमंत राजकारणी होते. त्यांची श्रीमंती पैसा, जमीन-जुमला किंवा सोन्या नाण्यात मोजता येणारी नव्हती. कारण त्यांनी सोन्याहून मौल्यवान गोष्ट कमावली, ती म्हणजे प्रेम करणारी हक्काची माणसं… त्यांचा तोच वारसा मी पुढे चालवतेय. प्रेम करणाऱ्या माणसांमुळे मीही प्रचंड श्रीमंत आहे, असं पंकजा म्हणाल्या आहेत. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

“मी थकणार नाही. मी रूकणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही… हा गोपीनाथ मुंडेचा ध्यास होता. त्याच मार्गाने मी पुढे जातेय.”, असं पंकजा म्हणाल्या.

काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही, असं पंकजा म्हणाल्या आहेत.

“मी ऊतणार नाही. मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही!”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण क्षेत्राच्या विस्तारावर भाष्य करताना महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यावरही पंकजा मुंडे बोलल्या. महापुरूषांबाबत वाईट बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.