“अप्पा, तुम्ही आमच्यातच आहात, दिलेल्या शिकवणीतून!; पवारसाहेब,आपण आमची ऊर्जा-उमेद”

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Dec 12, 2022 | 10:42 AM

धनंजय मुंडेंचं गोपीनाथ मुंडेंना अभिवादन, शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

अप्पा, तुम्ही आमच्यातच आहात, दिलेल्या शिकवणीतून!; पवारसाहेब,आपण आमची ऊर्जा-उमेद

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज जयंती आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ गडावर जात अभिवादन केलं. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. त्यानिमित्त धनंजय मुंडेंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गोपीनाथ मुंडेंना अभिवादन

‘हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय…’ अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून! विनम्र अभिवादन अप्पा…, असं धनंजय मुंडे म्हणालेत.

पवारांना शुभेच्छा

देशाच्या राजकारणातील महाराष्ट्राचा अभेद्य सह्याद्री, पद्मविभूषण आदरणीय खासदार शरद पवार साहेब आपणास जन्मदिनाच्या निमित्ताने हृदयपूर्वक शुभेच्छा. आपण आमची ऊर्जा व उमेद आहात, आपणास दीर्घायुष्य लाभो, ही प्रभू वैद्यनाथास प्रार्थना, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI