AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्याप्रकरण : सीआयडीच्या चार्ज सीटवर जरांगे पाटलांना शंका; उपस्थित केला हा मुद्दा

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सीआयडीकडून चार्ज शीट दाखल करण्यात आलं आहे, मात्र यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरण : सीआयडीच्या चार्ज सीटवर जरांगे पाटलांना शंका; उपस्थित केला हा मुद्दा
| Updated on: Mar 03, 2025 | 7:12 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली, वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारकडून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता, तसेच एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली होती. अखेर सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र या आरोप पत्रावर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

चार्ज शीटवर शंका आहे, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सीआयडीनं चार्ज शीट दाखल केलं. मात्र उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल करण्यात आलं, यामध्ये बड्या नेत्याचं नाव आलं नाही, त्यामुळे शंका आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. ते राहिले काय आणि नाही राहिले काय, काही फरक पडत नाही. मी अशांना मोजत नाही. पार कार्यक्रम लावून टाकला आहे.  आता बाकीच्यांना खडी फोडायला जावं लागेल, मुंडे मंत्री असो किंवा नसो काही फरक पडत नाही. आपले नीट नाहीत, राजकीय अजेंडा चालवतात, असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांना बरं वाटत नाहीये, त्यांची तब्येत बिघडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या तब्येतीबाबत देखील माहिती दिली. 15 दिवसांपासून अंग दुखत आहे, डोळ्यांना अंधाऱ्या आल्या सारख झालं होतं. प्रवास खूप झाला म्हणून तब्येत बिघडली, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख प्रकरणात नुकतचं सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे, या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Follow Us
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?