Mumbai Bus Strike: मोठी बातमी! बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, मुंबईकरांना बसणार मोठा फटका

मुंबईतील बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनेने आता आपले आंदोलन तीव्र केले असून आता ते उपोषणाला बसणार आहे.

Mumbai Bus Strike: मोठी बातमी! बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, मुंबईकरांना बसणार मोठा फटका
| Updated on: Aug 18, 2026 | 11:10 AM

Mumbai Best Bus Strike: मुंबईतील बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनेने आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी 18 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्टच्या विद्यमान कर्मचाऱ्यांबरोबरच, खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेट लीज बसमधील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या जातील.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन करारांची पूर्तता करणे समाविष्ट आहे. संघटनेने 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील वेतन करारांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी समान वेतनश्रेणी लागू करण्याची मागणीही केली आहे.

वेट लीज कर्मचाऱ्यांसाठी समान वेतनाची मागणी
बेस्ट कामगार संघटनेने वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. युनियनची मागणी आहे की, या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतन आणि लाभ दिले जावेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम देयके वेळेवर देण्याचीही त्यांची मागणी आहे. युनियनने बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित केला असून, त्याच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक निधीला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

युनियनच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील ऑपेरा हाऊस, केनेडी ब्रिज, 42 येथील बेस्ट वर्कर्स युनियनच्या कार्यालयात 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू होईल. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. बेस्ट कर्मचाऱ्यांनी जून महिन्यात एक उपोषण केले होते,  या उपोषणाचा फटका मध्यमवर्गीयांना बसतो. कारण रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या कामगार वर्गाला बस ही बरी पडते कारण तिकीट कमी असते आणि प्रवासही सोयीचा होतो. आता हे उपोषण किती दिवस सुरु राहत आणि यावर काय तोडगा निघतो याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us