AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagraj Manjule : मी आडनाव मुद्दाम लपवलंय, पण तरीही लोकं विचारतात, ‘जात’ विषयावर नागराज मंजुळे यांचं मोठं वक्तव्य

Nagraj Manjule : लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात समाजातील काही विषय प्रभावीपणे माडले आहेत. 'मी आडनाव मुद्दाम लपवलंय, पण तरीही लोकं...', असं म्हणत मंजुळे यांनी जात विषयावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Nagraj Manjule : मी आडनाव मुद्दाम लपवलंय, पण तरीही लोकं विचारतात, 'जात' विषयावर नागराज मंजुळे यांचं मोठं वक्तव्य
Nagraj Manjule
| Updated on: Aug 18, 2026 | 12:00 PM
Share

Nagraj Manjule : ‘खाबााशा’, ‘सैराट’, ‘फँड्री’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समाजातील अनेक विषय प्रभावीपणे माडंले. तर ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ सिनेमांमुळे मंजुळे यांनी माणसांमधील भेदभाव, सामाजिक विषमता आणि जातव्यवस्थेवर देखील प्रकाश टाकला. नागराज मंजुळे यांनी कधीच सिनेमांमधून फक्त चाहत्यांचं मनोरंजन केलं नाही तर, समाजाचं वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न देखील केला. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी ‘मी आडनाव मुद्दाम लपवलंय, पण तरीही लोकं मला विचारतात…’, असं म्हणत जात या विषयावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागराज मंजुळे यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मुलाखतीत नागराज मंजुळे यांना विचारण्यात आलं की, ‘सिनेमांमध्ये भूमिकांची आडनावं ठेवताना विचार करावा लागतो का?’ यावर मंजुळे म्हणाले, ‘जे महत्त्वाचं आहे, तेच आपल्याकडे लपवलं जातं आणि ती गोष्ट म्हणजे ‘जात’, मी लहानपणापासून अनेक सिनेमे पाहिले आहेत, ज्यामध्ये बहुतेकवेळा दाखवलं जातं की, अभिनेता – अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर दोघांचे घरचे त्यांना लग्नासाठी परवानगी देत नाहीत. कारण त्यामधील एक गरीब असतो आणि एक श्रीमंत असतो. यापेक्षा वेगळं असं काहीच नसतं…’

‘पण यामागे फक्त श्रीमंत आणि गरिबीचा प्रश्न नसतो. माझ्या लक्षात आल्यानुसार, यामध्ये जात देखील असते आणि जातीची आडनावं असतात…’, यावेळा मंजुळे यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘मनक हलाल’ सिनेमातील गाण्याचं उदाहरण दिलं. मंजुळे म्हणाले, ‘के पग घुंघरू बांधे’ या गाण्यात एक वाक्य आहे, ‘क्या देश है…क्या जात है…क्या उम्र है…क्या नाम है..अरे छोड़िये इन बातों से…हमको भला क्या काम है’, हे गाणं ऐकून मला असं झालं, प्रश्न विचाराय.. हिंदी सिनेमांमध्ये असंच आहे. विषयापर्यंत पोहोचले पण त्यांनी महत्त्वाचा प्रश्नच विचारला नाही.

अरे छोड़िये इन बातों से…हमको भला क्या काम है… असं बोलून विषयच बंद केला… आपण जे वास्तव आहे, त्याला मुलामा लावतो आणि गरीब – श्रीमंत किंवा काहीतरी वेगळंच दाखवतो… त्यामुळे मला असं वाटतं की, सिनेमातून नावं. आडनाव आणि व्यवसाय यांसारख्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. आता समाजात बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. आता अनेक लोक आडनाव न दाखवता स्वतःचं नाव किंवा वडिलांचं नाव लावतात. पण काही माणसं समोरच्याच आडनाव शोधूनच काढतात.

हे सुद्धा वाचा : ‘ती माझा आरसा…’, पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळेंनी थाटला दुसरा संसार, कोण आहे त्यांची पत्नी?

स्वतःच्या आडनावाबद्दल मंजुळे म्हणाले, ‘मी माझं आडनाव मुद्दाम लपवलं. पण तही देखील लोकं स्वतःहून विचारतात तुम्ही कुठले? यावर दलित साहित्यात अनेक छान कविता आहेत. माणूस जात शोधून काढतोच… म्हणजे एखाद्याने आडनाव सांगितलं तरी, त्यांचे पाहुणे सगळं काही विचारुन घ्यायचं… त्यानंतर शेवटी समोरच्याला समजतंच हा कुठला आहे.’ असं देखील नागराज मंजुळे ‘एबीपी माझा’च्या ‘कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात बोलले.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर