AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत मुख्य अतिथी नसणार, मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या..

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना मोठा विरोध होत आहे. हैद्राबाद येथील पदवी समारंभात त्यांच्या हाताने पदवी घेण्यास काही विद्यार्थ्यांनी नकार दिला. फक्त नकारच नाही तर विद्यार्थ्यांकडून त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. आता याच पार्श्वभूमीवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने मोठा निर्णय घेतला.

मुंबईतील दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत मुख्य अतिथी नसणार, मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या..
Chief Justice of India Surya Kant
| Updated on: Aug 18, 2026 | 11:55 AM
Share

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जेनझींबद्दल मोठे विधान केले आणि त्यानंतर देशात एक मोठी पार्टी उदयास आली. त्यांनी जेनझींना थेट कॉकरोच म्हटले होते. त्यानंतर मोठा वाद झाला. आता काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, सूर्यकांत यांचा विरोध अजूनही काही कमी होताना दिसत नाहीये. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरुन इन्स्टाग्रामवर कॉक्रोच अकाऊंट काढले. अभिजीत दिपके यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. फक्त प्रतिसाद नाही तर नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने उभारले आणि थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला.

हैदरबादमधील NALSAR विद्यापीठातील पदवी सोहळ्याला सरन्यायाधीश यांना बोलावण्यात आले होते. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने पदवी घेण्यास स्पष्ट नकार दिला. हेच नाही तर विद्यार्थी आंदोलनाला बसले. ज्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. पण अभिजीत दिपके यांनी मोठा इशारा दिला आणि विद्यार्थ्यांवरील कारवाई तात्काळ मागे घ्यावी लागली.

यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे येतंय. मुंबई TISS टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश मुख्य अतिथी नसणार आहेत. हा मोठा निर्णय घेण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात त्यांच्याऐवजी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. परमेश हे मुख्य अतिथी असतील. TISS ने यापूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची मुख्य अतिथी म्हणून नियुक्ती केली होती आणि दीक्षांत समारंभात त्यांचे भाषण होणार होते.

मात्र, सध्याचा वाद आणि विद्यार्थ्यांचा होणारा विरोध बघता हा मोठा निर्णय घेण्यात आला. हैद्राबादमधील विद्यापीठातील 450 हून अधिक विद्यार्थ्यांनी पदवी समारंभात मुख्य अतिथिी म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विरोधात निदर्शने केली होती. ज्यानंतर मोठा वाद झाला. त्यानंतर हा वाद टाळण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने मोठा निर्णय घेतला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात