भंडाऱ्यात चिमुकलीवर अत्याचार; आज बंदची हाक, आरोपीला फाशीची मागणी

भंडारा शहरात मानवता कलंकित करणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका 3 वर्षीय निष्पाप बालिकेला सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 30 वर्षीय नराधम आरोपी रोहित वासनिक याला अटक केली आहे. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज 'भंडारा बंद'ची हाक देण्यात आली आहे.

भंडाऱ्यात चिमुकलीवर अत्याचार; आज बंदची हाक, आरोपीला फाशीची मागणी
Buldhana Bandh
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 5:51 PM

शुभम कुलकर्णी: 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात नागरिकांमधून तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संतप्त नागरिकांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवून नराधम आरोपी रोहित वासनिक याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या अमानुष कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भंडाऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील तीन वर्षीय बालिकेवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

नराधम आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याचे वकीलपत्र कुणीही स्वीकारू नये, या प्रमुख मागण्यांसह महात्मा गांधी चौकातून जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Loading...

नराधमाला तात्काळ शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस प्रशासनानं संतप्त भंडाराकरांना आश्वासन दिलं. मोर्चानंतर त्रिमूर्ती चौकात तासभर आंदोलकांनी ठिय्या मांडला. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. अधिक माहिती अशी आहे की, भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची घटना काल घडली होती.

या प्रकारानंतर संतप्त भंडारावाशीयांनी आज या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी भंडारा बंदचं आवाहन केलं होतं. आरोपीला तातडीनं शिक्षा व्हावी या दृष्टीनं कुणीही वकीलपत्र स्वीकारू नये, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा, या मागणीसाठी भंडाराकरांनी गांधी चौकातून मोर्चा काढला. जिल्हा सत्र न्यायालयावर निघालेला हा मोर्चा पोलिसांनी वाहतूक व्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं त्रिमूर्ती चौकात अडविला. त्रिमूर्ती चौकात सुमारे तासभर या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं.

अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आंदोलनास्थळी भेट देत आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या दृष्टीनं सबळ पुराव्यासह चार्जशीट तयार करून ती लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्याचं आश्वासन यावेळी पोलीस प्रशासनानं आंदोलकांना दिलं. तब्बल तासभराच्या ठिय्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांच्या आश्वासन मिळाल्यानंतर भंडाराकरांनी त्यांच आंदोलन थांबविलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us