Bhandara | वाळू माफियांच्या विरोधात भंडारा जिल्हा प्रशासन सरसावले; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक वाळूघाटावर मध्यरात्री धडकले

| Updated on: May 05, 2022 | 3:20 PM

जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मध्यरात्री वाळुघाटावर धडकले. वडेगाव येथे 11 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. दोघांना अटकही करण्यात आली.

Bhandara | वाळू माफियांच्या विरोधात भंडारा जिल्हा प्रशासन सरसावले; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक वाळूघाटावर मध्यरात्री धडकले
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक वाळूघाटावर मध्यरात्री धडकले
Image Credit source: t v 9
Follow us on

भंडारा : भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी हल्ला प्रकरण जिल्हा प्रशासनानं गंभीरतेनं घेतलंय. शिवसेनेन स्टंटबाजी करत पोलीस अधीक्षकांवरच गंभीर आरोप केले होते. वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याची त्यांची ओरड होती. परंतु, आता जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला. भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम (Collector Sandeep Kadam) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांनी मध्यरात्री भंडारा तालुक्यातील वडेगाव (Vadegaon in Bhandara taluka) रेतीघाटावर धडक दिली. या कारवाईत तब्बल 11 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. विशेष म्हणजे दोन वाळू तस्करांना अटक करण्यात आली आहे. जयदेव धनराज बोरकर (35, रा. बेरोडी) आणि महेंद्र रतिराम हजारे (21, रा. सुरेवाडा) ही अटक झालेल्यांची नावे आहेत. दोघांना अटक करण्यात आल्यानं इतर वाळू माफियांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. त्यांच्यावरही आता कारवाईची टांगती तलवार आहे.

वडेगाव येथे 11 ट्रॅक्टर जप्त

जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मध्यरात्री वाळू घाटावर धडकले. वडेगाव येथे 11 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. दोघांना अटकही करण्यात आली. उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्या पथकावर बेटाळा येथे गेल्या बुधवारी पहाटे 22 वाळू तस्करांनी हल्ला केला होता. याचा परिणाम म्हणून की काय वाळू तस्करांची कंबर मोडण्यासाठी हल्लेखोर वाळू तस्करांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव हे उपविभागीय अधिकारी व तहसीदारांसह भंडारा तालुक्यातील वडेगाव रेती घाटावर धडकले.

महसूल चोरी करणाऱ्यांना सोडणार नाही

अधिकारी कारवाईसाठी आल्याचे पाहताच वाळू तस्करांनी वाहन सोडून पळ काढला. यात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 11 रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचा अशा धडक कारवाई वाळू तस्करांचे दाबे दणाणले आहेत. तहसीलदार अरविंद हिंगे हे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांसह गेले होते. मध्यरात्रीचा थरार त्यांनी सांगितला. महसूल चोरी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचं हिंगे म्हणाले.

हे सुद्धा वाचा