Bhandara : भंडाऱ्यात पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला; 7 पैकी 4 राष्ट्रवादीच्या ताब्यात, काँग्रेसला दोन, तर भाजपला एका सभापती पदावर समाधान

| Updated on: May 06, 2022 | 9:08 PM

साकोली पंचायत समितीवर सभापती म्हणून काँग्रेसचे गणेश आले, तर उपसभापती म्हणून काँग्रेसच्या सरिता लालू करंजेकर निवडून आल्या.

Bhandara : भंडाऱ्यात पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला; 7 पैकी 4 राष्ट्रवादीच्या ताब्यात, काँग्रेसला दोन, तर भाजपला एका सभापती पदावर समाधान
साकोली - काँग्रेसच्या सरिता लालू करंजेकर यांचा सत्कार करताना काँग्रेसचे पदाधिकारी.
Image Credit source: t v 9
Follow us on

भंडारा : भंडाऱ्यात पंचायत समितीत (Panchayat Samiti ) राष्ट्रवादीचा बोलबाला दिसून आला. जिल्ह्यातील 7 पैकी 4 पंचायत समितीवर राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे. तर भाजपला (BJP) सभापती पदावर तर, काँग्रेसला दोन सभापती पदावर समाधानी राहावे लागले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सभापती मोहाडी, लाखांदूर, पवनी व भंडारा पंचायत समितीवर निवडून आले. भंडारा पंचायत समितीत रत्नमाला चेटुले (Ratnamala Chetule), लाखांदूरला संजना वरखडे, पवनीत नूतन कुरझेकर, तर मोहाडीत रितेश वासनिक यांच्या गळात सभापती पदाची माळ पडली आहे. तुमसर भाजपाचे नंदू रहांगडाले तर साकोलीत काँग्रेस गणेश आले व लाखनीत प्रणाली सारवे पंचायत समितीपदी निवडून आले. त्यामुळे भविष्यात येणारी जिल्हा परिषदेच्या निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

भंडाऱ्यात राष्ट्रवादी-भाजपची सत्ता

भंडारा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी-भाजपची सत्ता बसली. राष्ट्रवादीच्या रत्नमाला चेटुले सभापती झाल्या, तर भाजपचे प्रशांत खोब्रागडे हे उपसभापती झाले. पवनी पंचायत समितीवर राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता बसली. राष्ट्रवादीच्या नूतन कुर्झेकर या सभापती, तर शिवसेनेचे विनोद बागडे हे उपसभापती म्हणून निवडून आले. मोहाडी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे रितेश वासनिक हे सभापती, तर भाजपचे बबलू मलेवार हे उपसभापती म्हणून निवडून आले.

साकोलीत काँग्रेस, तर लाखांदुरात राष्ट्रवादीची बाजी

तुमसर पंचायत समितीवर भाजपचे नंदू रहांगडाले हे सभापती, तर काँग्रेसचे हिरालाल नागपुरे हे उपसभापती म्हणून निवडून आले. साकोली पंचायत समितीवर सभापती म्हणून काँग्रेसचे गणेश आले, तर उपसभापती म्हणून काँग्रेसच्या सरिता लालू करंजेकर निवडून आल्या. लाखनी पंचायत समितीवर काँग्रेसच्या प्रणाली विजय सारवे, तर उपसभापती म्हणून भाजपचे गिरीश बावनकुळे निवडून आले. लाखांदूर पंचायत समितीवर सभापती राष्ट्रवादीच्या संजना वरखडे, तर राष्ट्रवादीच्याच उपसभापती निमबाई ठाकरे निवडून आल्या.

हे सुद्धा वाचा