Bhandara Crime : डॉक्टर पुत्र निघाला दरोड्याचा मास्टर माइंड, साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद

| Updated on: May 11, 2022 | 8:13 PM

पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तपासले असता त्यांच्याजवळून लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली. साकोली तालुक्यातील आमगाव येथील डॉ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जाण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले आहे.

Bhandara Crime : डॉक्टर पुत्र निघाला दरोड्याचा मास्टर माइंड, साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद
डॉक्टर पुत्र निघाला दरोड्याचा मास्टर माइंड
Image Credit source: TV9
Follow us on

भंडारा : साकोलीच्या एका प्रतिष्ठीत डॉक्टरच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरां (Robbers)ना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे साकोली तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर अटक (Arrest) केल्याची घटना केली. दरोडेखोरात साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाइंड (Master Mind) असल्याचे सांगण्यात येत आहे. सूरज राम अवतार जयस्वाल (28 रा. संजयनगर गोविंदपूर), मिलिंद नरेंद्र गजभिये (36 रा. नागपूर), रामेश्वर ज्ञानीराम वाढई (32 रा. इंदिरा गांधी वार्ड कुंभारटोली भंडारा), अरविंद वामन डोंगरवार (42 रा. घानोड, ता. साकोली), कोमल रमेश बनकर (26 रा. छोटा गोंदिया) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. अरविंद डोंगरवार हा साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केली अटक

साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी फोनद्वारे मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तपासले असता त्यांच्याजवळून लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली. साकोली तालुक्यातील आमगाव येथील डॉ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जाण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले आहे. विशेष म्हणजे डॉक्टर परिवारासह बाहेरगावी असून त्यांची आई एकटी घरी होती. मात्र भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात आरोपींमध्ये साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा